मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Sky Diving करताना 10 हजार फुटांवर तो झाला बेशुद्ध, पॅराशूटही उघडलं नव्हतं.. आणि मग..

Sky Diving करताना 10 हजार फुटांवर तो झाला बेशुद्ध, पॅराशूटही उघडलं नव्हतं.. आणि मग..

वेळीच मिळालेल्या या मदतीमुळे बेनचा जीव वाचला, अन्यथा, 10 हजार फूट उंचीवरून पडल्यानंतर त्याचं काय झालं असतं, हे सहज समजू शकतं. तब्बल 6 वर्षांनंतर बेन पिजननं आपल्या फेसबुक अकाउंटवर ही घटना पोस्ट केली आहे.

  • Published by:  News18 Desk
लंडन, 26 मार्च : असं म्हणतात की छंद ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. पण, कधीकधी त्यांना असं करणं भारी पडू शकतं. आपल्या सहकाऱ्यांसह करत होता पॅरा जंपिंग (Para Jumping) 'द सन'च्या रिपोर्टनुसार, लंडनमध्ये राहणाऱ्या बेन पिजनसोबतही (Ben Pigeon) असंच काहीसं घडलं. तो त्याच्या मित्रांसोबत स्काय डायव्हिंग (Sky Diving) करत होता. त्याचे प्रशिक्षक अँडी लॉक (Andy Locke) हेलिकॉप्टरमधून उडी मारल्यानंतर त्याला पॅराशीटमधून सुरक्षितपणे खाली उतरण्याचं प्रशिक्षण देत होते. तो स्वतःही बाकीच्या सहकाऱ्यांसोबत पॅरा जंप (Para Jump) करत होता. या संपूर्ण प्रशिक्षण प्रक्रियेच्या चित्रीकरणासाठी त्यांनी हेल्मेटमध्ये कॅमेरा बसवला होता. डोक्यावर लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये सुरू होतं रेकॉर्डिंग Ben Pigeon नं आणि त्याच्या सहकाऱ्यांनी दिवसातून 9 वेळा पॅरा जंप केलं आणि पॅराशूटद्वारे सुरक्षितपणे खाली उतरले. त्याची कामगिरी पाहून प्रशिक्षकासह इतरही खूश झाले. दिवसाच्या 10व्या आणि शेवटच्या उडीमध्ये त्यानं हेलिकॉप्टरमधून सुमारे 10 हजार फूट उंचीवरून उडी मारली. तो जवळपास 500 फूट खाली पोहोचला असावा, तेवढ्यात आणखी एका सहकाऱ्यानं त्याच्यावर उडी मारली. त्याचा पाय वेगात बेनच्या डोक्याला लागला, त्यामुळं तो बेशुद्ध झाला. तोपर्यंत त्याचं पॅराशूटही उघडलं नव्हतं. हे वाचा - कुत्रा चावल्याने म्हशीचा मृत्यू; पण अख्खं गाव पोहोचलं रेबिजचं इंजेक्शन घ्यायला कोचनं वाचवला खाली पडणाऱ्या तरुणाचा जीव बेनचे प्रशिक्षक अँडी आधीच उडी मारून पॅराशूटनं हळूहळू खाली उतरत होते. बेनला वेगाने खाली पडताना पाहून त्यांनी स्वतःचं पॅराशूट (Parachute) अॅडजस्ट केलं आणि ते त्याच्या खाली आले. तोपर्यंत केवळ 5 हजार फूट खाली जमीन शिल्लक होती. अँडी यांनी बेनला वरून पडताना पकडलं आणि त्याचं आपात्कालीन पॅराशूट उघडण्याचा प्रयत्न केला. पॅराशूट उघडताच, बेन वेगानं वरती गेला आणि नंतर हळूहळू खाली आला. हे वाचा - 2 बायका फजिती ऐका! संपत्ती नव्हे, तर दोघींसाठी चक्क पतीचीच करावी लागली वाटणी घटनेनंतर स्काय डायव्हिंग सोडलं वेळीच मिळालेल्या या मदतीमुळे बेनचा जीव वाचला, अन्यथा, 10 हजार फूट उंचीवरून पडल्यानंतर त्याचं काय झालं असतं, हे सहज समजू शकतं. तब्बल 6 वर्षांनंतर बेन पिजननं आपल्या फेसबुक अकाउंटवर ही घटना पोस्ट केली आहे. या घटनेनं त्याचं आयुष्यच बदलून गेल्याचं त्यानं सांगितलं. पूर्वी तो खूप स्काय डायव्हिंग करायचा. पण नंतर त्यानं ते सोडूनच दिलं. आता त्याला कुटुंबासोबत जास्त वेळ घालवायला आवडतं.
First published:

Tags: Hobby, London

पुढील बातम्या