जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / जगातील सर्वात प्रदूषित देशांमध्ये भारताचे दोन शेजारी; आपला नंबर कितवा?

जगातील सर्वात प्रदूषित देशांमध्ये भारताचे दोन शेजारी; आपला नंबर कितवा?

हवा प्रदूषण

हवा प्रदूषण

IQAir या स्विस प्रदूषण तंत्रज्ञान कंपनीने 2021 मध्ये जगातील सर्वाधिक प्रदूषित देशांची यादी जाहीर केली. या यादीत भारताच्या दोन शेजारी देशांचा समावेश आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 2 डिसेंबर : गेल्या काही वर्षांत वाहनांचा वाढता वापर आणि वाढत्या औद्योगिकीकरणामुळे वायुप्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. यामुळे हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत आहे. वायुप्रदूषणामुळे आरोग्यविषयक अनेक समस्या निर्माण होत आहेत. जगभरात वायुप्रदूषण ही मोठी समस्या बनली असून, प्रत्येक देश यावर आपापल्या परीने उपाययोजना करत आहे. परंतु, या उपाययोजनांमुळे कोणाताही सकारात्मक बदल अजूनही दृष्टिपथात आलेला नाही. हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवणाऱ्या आयक्यू एअर (IQ Air) या स्विस पोल्युशन टेक्नॉलॉजी कंपनीने जगातल्या प्रदूषित देशांची यादी तयार केली आहे. 2021मध्ये तयार केल्या गेलेल्या या यादीत भारत पाचव्या, तर बांगलादेश पहिल्या स्थानावर आहे. जगभरात वायुप्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. एकीकडे वायुप्रदूषणात वाढ होत असताना, दुसरीकडे उपाययोजना करूनही हे प्रदूषण कमी होताना दिसत नाही. भारताचा विचार करता, देशात वायुप्रदूषणात वाढ होत असल्याने हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस घसरत चालली आहे. दर वर्षी हिवाळ्यात दिल्ली आणि आसपासच्या भागात वायुप्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता कमालीची ढाळताना दिसते. वाढत्या वायुप्रदूषणामुळे आरोग्यविषयक समस्या वाढत आहेत. आयक्यूएअर या कंपनीने 2021मध्ये जगातल्या प्रदूषित देशांची एक यादी तयार केली आहे. या यादीत भारत पाचव्या स्थानावर आहे. राजधानी दिल्लीसह देशातली अनेक प्रमुख शहरं वाढत्या वायुप्रदूषणाच्या यादीत आहेत. भारतात इंडस्ट्रीज हे प्रदूषणाचं मुख्य कारण आहे. वाचा - रोज बटाटे खाऊनही वजन होऊ शकतं कमी; संशोधकांचा दावा मध्य आशियातल्या ताझिकिस्तानमध्ये हवा गुदमरून टाकणारी आहे. आयक्यूएअर कंपनीच्या यादीत ताझिकिस्तान हा देश जगातल्या चौथ्या क्रमांकाचा सर्वांत प्रदूषित देश म्हणून समाविष्ट आहे. सिमेंट आणि कोळसा ऊर्जा प्रकल्पांमुळे तिथे सर्वाधिक वायुप्रदूषण होतं. भारताचा शेजारी देश असलेला पाकिस्तानदेखील जगातल्या सर्वांत प्रदूषित देशांच्या यादीत आहे. आयक्यूएअरच्या अहवालानुसार, पाकिस्तान हा जगातल्या तिसऱ्या क्रमाकांचा सर्वांत प्रदूषित देश आहे. वायुप्रदूषणामुळे तिथल्या नागरिकांचं आयुर्मान चार वर्षांनी कमी झालं आहे. आफ्रिकेतला चाड हा जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचा प्रदूषित देश आहे. या देशात स्वच्छतेचा अभाव आणि कुपोषणानंतर वायुप्रदूषण ही तिसरी सर्वांत मोठी समस्या आहे. यामुळे तिथल्या नागरिकांचा मृत्यूदेखील होतो. 2017मध्ये या देशातल्या 14 हजार जणांचा वायुप्रदूषणामुळे मृत्यू झाला आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    बांगलादेश हा जगातला सर्वांत प्रदूषित देश आहे. 16 कोटी लोकसंख्या असलेला हा देश आयक्यू एअर कंपनीच्या प्रदूषित देशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. बांगलादेशाची राजधानी ढाका येथे वायुप्रदूषणामुळे मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात