नवी दिल्ली, 1 जानेवारी : भारत-पाकिस्तान (India Pakistan) या दोन्ही देशांमध्ये स्वतंत्र झाल्यापासून तणाव पाहायला मिळाला आहे. अशा स्थितीत नवीन वर्षाच्या मुहूर्तावर भारत-पाकिस्तानने आपापल्या आण्विक प्रतिष्ठानांची (Nuclear Installations) यादी एकमेकांना सुपूर्द केली आहे. आण्विक हल्ल्यापासून वाचवण्यासाठी दोन्ही देशांमधील करारानुसार हे करण्यात आलं आहे. याशिवाय दोन्ही देशांनी भारत आणि पाकिस्तानच्या कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्यांच्या यादीचीही देवाणघेवाण करून त्यांची लवकर सुटका करण्याची मागणी केली आहे. यामध्ये दोन्ही देशांच्या तुरुंगात बंद असलेले स्थानिक नागरिक आणि लष्कराच्या जवानांचा समावेश आहे. आज 1 जानेवारी रोजी नवी दिल्ली आणि इस्लामाबादमध्ये एकाच वेळी राजनैतिक माध्यमांद्वारे एकमेकांना त्यांच्या अण्वस्त्रांची यादी सुपूर्द करण्यात आली. हे 31 डिसेंबर 1988 रोजीच्या ‘अण्वस्त्र आणि सुविधांवरील हल्ल्यांच्या प्रतिबंधावरील कराराची तरतूद’ अंतर्गत केले गेले आहे, जे 27 जानेवारी 1991 पासून लागू करण्यात आलं आहे. या करारांतर्गत अशी तरतूद आहे की, प्रत्येक वर्षी 1 जानेवारी रोजी भारत आणि पाकिस्तान परस्परांशी संवाद साधतील आणि अण्वस्त्र आस्थापने आणि सुविधांशी संबंधित माहिती ऐकमेकांना देतील. आता हे काय नवं संकट! ओमिक्रॉन कोरोनानंतर Florona ची दहशत; इथं सापडला पहिला रुग्ण परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या करारांतर्गत दोन्ही देशांमधील अशा यादीची ही 31वी देवाणघेवाण आहे. याची सुरुवात 1 जानेवारी 1992 रोजी झाली. त्याचवेळी दोन्ही देशांच्या तुरुंगात असलेल्या नागरिक आणि मच्छिमारांची यादीही दिल्ली आणि इस्लामाबादमधील राजनैतिक माध्यमातून एकमेकांच्या देण्यात आली आहे. सध्या 282 पाकिस्तानी नागरीक कैदी आणि 73 मच्छीमार भारताच्या तुरुंगात बंदी आहेत. त्याचबरोबर भारताचे 51 नागरिक आणि 577 मच्छीमार पाकिस्तानच्या कैदेत आहेत, यापैकी किती मच्छिमार भारतीय आहेत हे सांगणे कठीण आहे. ही यादी भारत आणि पाकिस्तानच्या तुरुंगात बंद असलेल्या दोन्ही देशांच्या नागरिकांच्या सुटकेसाठी कॉन्सुलर ऍक्सेसवरील करारांतर्गत देण्यात आली आहे, हा करार मे 2008 मध्ये झाला होता. या संदर्भात एक निवेदन जारी करून भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, सरकारने पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या नागरीक कैदी, लष्कराचे कर्मचारी आणि मच्छिमारांची लवकर सुटका करण्याची मागणी केली आहे आणि त्यांच्या बोटी परत करण्याची मागणीही केली आहे. यावेळी, पाकिस्तानला दोन भारतीय नागरिक आणि 356 मच्छिमारांना सोडण्याचा संदेश देण्यात आला आहे, ज्यांचे भारतीय नागरिकत्व निश्चित झाले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.