चीनला धडा शिकवण्यासाठी भारत- जपान एकत्र; काय आहे India- Japan Military Pact

चीनला धडा शिकवण्यासाठी भारत- जपान एकत्र; काय आहे India- Japan Military Pact

चीनला धडा शिकवण्यासाठी भारताने आता जपानबरोबर हातमिळवणी केली आहे. The logistics Exchange Memorandum of Agreement या ऐतिहासिक करारानंतर आता फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया बरोबर देखील करार करणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 सप्टेंबर : भारत आणि चीन सीमेवर (India- china border dispute) सध्या मोठ्या प्रमाणात वादविवाद सुरु आहेत. एकीकडे भारतीय भूभागावर कब्जा करण्याचा प्रयत्न करत चीन (China) तो आपला असल्याचा कांगावा करत आहे. दुसरीकडे दक्षिण चिनी समुद्राच्या (South China sea) 80 टक्के भागावर आपला दावा करत आहे. त्यामुळे जपानचं सार्वभौमत्वही धोक्यात आहे. चीनविरोधात आता या दोन देशांनी एकत्र येत नवा लष्करी करार ( India- Japan Military Pact) केला आहे. काय आहे हा करार आणि चीनला यामुळे कसा हादरा बसेल? जाणून घेऊ या सविस्तर...

चीनला धडा शिकवण्यासाठी जग एकत्र

आर्थिक आघाडीवर गरीब देशांना भरमसाठ कर्ज देऊन आपल्या जाळ्यात ओढत आहे आणि त्यांच्या देशाच्या धोरणात देखील घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे चीनसारख्या धूर्त राष्ट्राला धडा शिकवण्यासाठी भारत आपल्या परीने प्रयत्न करत दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर नुकताच भारत आणि जपानमध्ये एक लष्करी करार झाला आहे. याअंतर्गत दोन देश आपल्या सैनिकांना मदत करत करणार आहे. यामुळे चीनला धडा शिकवण्यासाठी आणि शह देण्यासाठी मदत मिळणार आहे. त्यानंतर आता भारत फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया बरोबर देखील करार करणार आहे.

काय आहे करार?

गहन चर्चेनंतर भारत आणि जपानमध्ये हा करार झाला असून यामध्ये ते एकमेकांच्या देशांच्या समुद्री तळांचा वापर करू शकणार आहेत. म्युच्युअल लॉजिस्टिक सपोर्ट अरेंजमेंट म्हणजेच MLSA असे या कराराचे नाव आहे. भारताचे सुरक्षा सचिव अजय कुमार आणि जपानचे राजदूत सुजुकी सतोशी यांनी या करारावर हस्ताक्षर केलं आहे. अशाप्रकारे भारत आणि जपानमध्ये पहिल्यांदा सुरक्षा करार झाला आहे. याअंतर्गत जपानी सेना आपल्या तळांवर भारतीय सैन्यासाठी साधनसामुग्री देखील पुरवणार आहे. त्याचबरोबर भारतीय सैन्य तळांवर जपानी सैन्याला देखील हीच मदत मिळणार आहे. युद्धाच्या परिस्थितीत हा करार खूप उपयोगी आणि महत्वपूर्ण ठरणार आहे. समुद्रामध्ये चीनची घुसखोरी दहशतीमध्ये बदलल्यानंतर भारत आणि जपानमध्ये या करारावर चर्चा सुरु होती. त्यामुळे या कराराला एका पद्धतीने अँटी चायना करार देखील म्हटले जात असून यामुळे हिंदी महासागरामध्ये चीनला मोठा धक्का बसणार असून भारताची बाजू मजबूत होणार आहे.

समुद्री मार्गे स्वतःला ताकदवान बनवण्यासाठी पाकिस्तानला कर्ज देऊन कमजोर बनवण्यात येत आहे. सध्या चीनने पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली असून कराची आणि ग्वादर बंदरापर्यंत चीनने आपल्यासाठी मार्ग बनवला आहे. त्याचबरोबर समुद्रात मजबूत होण्यासाठी कंबोडिया आणि श्रीलंकेबरोबर देखील करार केले आहेत. कोरोनाच्या काळात देखील चीनच्या या कुरापती थांबल्या नसून पाश्चिमात्य देशांना चीनचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

भारताचा फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियाबरोबर करार झाला आहे. 2018 मध्ये फ्रान्स बरोबर झालेल्या करारानुसार भारताचं सैन्य फ्रान्सच्या हवाई तळांचा वापर करू शकतील. त्याचबरोबर गरज भासल्यास सैन्याची मदत देखील करणार आहे. तसेच विमानांच्या संदर्भात काही मदत लागल्यास देखील मदत करणार आहे.

याच्यासारखा ऑस्ट्रेलियाबरोबर देखील करार झाला असून याअंतर्गत आपल्या सैनिकांची मदत करण्यास दोन्ही सैन्य तत्पर असणार आहेत. भारत आणि अमेरिकेमध्ये देखील २०१६ मध्ये अशाच पद्धतीने करार झाला होता. The logistics Exchange Memorandum of Agreement नावाच्या करारामुळे भारत आणि अमेरिकेचे नौदल एकमेकांना अनेक प्रकारची मदत करणार आहेत. यामध्ये गरज भासल्यास बंदराचा देखील वापर करू शकणार आहेत. युरेशियन टाइम्सच्या वृत्तानुसार समुद्रामध्ये चीनची घुसखोरी आणि दहशत रोखण्यासाठी भारत, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया नवीन करार करण्याची शक्यता आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यानुअल मॅक्रोन यांनी दिल्ली, कॅनबेरा आणि पॅरिसमधील सैन्य कारासंबंधी माहिती दिली असून यासाठी तिन्ही देशांमध्ये 9 सप्टेंबरपासून चर्चा सुरू झाली आहे.

हिंदुस्तान टाइम्समध्ये आलेल्या वृत्तानुसार, तिन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयांमध्ये यासंदर्भात चर्चा सुरू आहे. याअंतर्गत बंदराचा वापर, हत्यारांची देवाणघेवाण आणि लष्करी क्षमता वाढवण्याची चाचपणी सुरू आहे. यामध्ये भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये यासंदर्भात करार होणार असून इंडो पॅसिफिक पातळीवर याअंतर्गत कार्य करण्यात येणार आहे. यामुळे समुद्री मार्गाने व्यापार करणं सोपं होणार असून सैन्यस्थळं मजबूत करण्यासाठी देखील मदत होणार आहे.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: September 15, 2020, 4:43 PM IST
Tags:

ताज्या बातम्या