मराठी बातम्या /बातम्या /विदेश /अफगाणी पॉपस्टार म्हणते पाकिस्तान नव्हे भारतच आहे सच्चा मित्र! तालिबानबद्दल काय बोलली आहे वाचा...

अफगाणी पॉपस्टार म्हणते पाकिस्तान नव्हे भारतच आहे सच्चा मित्र! तालिबानबद्दल काय बोलली आहे वाचा...

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबाननं (Taliban) वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर देशाबाहेर पडलेल्या प्रसिद्ध पॉप स्टार अर्याना सईदनं (Aryana Saeed) तालिबान आणि पाकिस्तानवर (Pakistan) जोरदार टीका केली आहे.

न्यूयॉर्क, 24 ऑगस्ट : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबाननं (Taliban) वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर देशाबाहेर पडलेल्या प्रसिद्ध पॉप स्टार अर्याना सईदनं (Aryana Saeed) तालिबान आणि पाकिस्तानवर (Pakistan) जोरदार टीका केली आहे. भारत हाच अफगाणिस्तानचा खरा मित्र असून पाकिस्ताननं नेहमीच दहशतवादाला खतपाणी घातलण्याचं काम केलं असल्याचा आरोप तिनं केला आहे.

तालिबानी आणि पाकिस्तान्यांचं गुळपीठ

तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर अमेरिकी विमानातून देशाबाहेर प्रसिद्ध पॉपस्टार अर्याना सईद बाहेर पडली. आपण देशातून बाहेर पडलो असलो तरी अफगाणिस्तानमधील खरी परिस्थिती आणि देशवासियांच्या खऱ्या भावना आणि वेदना जगासमोर मांडतच राहणार असल्याचं तिनं म्हटलं आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता येण्यामागे पाकिस्तानचाच हात असल्याचा आरोप तिनं केला आहे.

पाकिस्तान आणि तालिबानचं साटंलोटं

अफगाणिस्तानमध्ये जेव्हा जेव्हायामु तालिबानी दहशतवादी पकडला जात असे, तेव्हा तेव्हा त्याचे संबंध हे पाकिस्तानशी असल्याचं उघड होत होतं. त्यामुळे पाकिस्तानच अफगाणिस्तानमधील दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचं स्पष्ट असून देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा अर्यानानं केला आहे. या सगळ्यामुळे साहजिकपणे प्रत्येक सर्वसामान्य अफगाणी नागरिक देशाच्या वाताहतीसाठी पाकिस्तानलाच जबाबदार धरत असल्याचं तिनं एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

तालिबानमध्ये महिलांवर अत्याचार

तालिबानच्या दृष्टीनं महिला ही केवळ उपभोगाची गोष्ट असल्याचे आरोप अफगाणिस्तानमधून बाहेर पडलेल्या अऩेक महिलांनी यापूर्वी केले आहेत. तालिबानची 20 वर्षांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये राजवट होती. या काळात मुलींच्या शिक्षणावर, नोकरी करणाऱ्यावर किंबहूना एकटीनं बाहेर फिरण्यावरदेखील मर्यादा होत्या. आता पुन्हा तालिबानचं राज्य अफगाणिस्तानमध्ये प्रस्थापित होत असल्यामुळे सर्वाधिक धास्ती ही महिलांना वाटत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे या देशातील अनेक महिला देश सोडून बाहेर पडणंच पसंत करत असल्याचं दिसत आहे.

First published:

Tags: Afghanistan, Pakisatan, Taliban