मराठी बातम्या /बातम्या /विदेश /टीका होत असतानाही भारताकडून Rihanna च्या देशाला मदत, पंतप्रधानांनी PM मोदींचे मानले आभार

टीका होत असतानाही भारताकडून Rihanna च्या देशाला मदत, पंतप्रधानांनी PM मोदींचे मानले आभार

भारतामध्ये सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला (Farmers Protest) पाठिंबा देत आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रॉबिन रिहाना फेन्टीने (Robyn Rihanna Fenty) ट्वीट केले होते. दरम्यान याच रिहानाच्या देशाला भारताने कोव्हिड लस पुरवली आहे आणि देशाच्या पंतप्रधानांनी PM मोदींचे आभार मानले आहेत.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 05 फेब्रुवारी: भारतामध्ये सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला (Farmers Protest) पाठिंबा देत आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रॉबिन रिहाना फेन्टीने (Robyn Rihanna Fenty) ट्वीट केले होते. रिहानाच्या ट्वीटनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरुन या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया येत आहेत. तिच्या ट्वीटनंतर भारतात अनेकांनी तिचे कौतुक केले तर काहींनी हा आमच्या देशातील प्रश्न आहे इतरांनी त्यात नाक खुपसू नये अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एकीकडे हा प्रकार सुरू आहे तर दुसरीकडे रिहानाचा देश बार्बाडोस (Barbados) च्या पंतप्रधान मिया अमोर मोटली यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. ऑक्सफर्ड अ‍ॅस्ट्रॅजेनेका अँटी-कोरोना व्हायरस लसीचे 1.00,000 डोस दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.

बार्बाडोसच्या पंतप्रधान मिया अमोर मोटली यांनी 4 जानेवारीला मोदींना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी असे म्हटले आहे की, 'माझं सरकार आणि आमच्या जनतेच्या वतीने मी कोरोनावरील लस दान केल्याबद्दल तुम्ही, तुमचे सरकार आणि भारताच्या जनतेचे आभार मानते.'

'आरोग्य व कल्याण मंत्री आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी या दोघांनीही कोरोनावरील ही लस बार्बाडोसमध्ये वापरण्यास मंजुरी दिली आहे आणि उत्पादकांच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच ती दिली जाईल.' असे मिया अमोर मोटली यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

(हे वाचा - Maratha Reservation : मराठा आरक्षणाची सुनावणी 8 मार्चपर्यंत लांबणीवर)

कोरोनावरील लशीसाठी भारताकडे जगभरातील जवळपास 152 देशांनी मागणी केली आहे. त्यांना मार्चमध्ये कमीत कमी 16 दशलक्ष डोस पुरवले जातील अशी अपेक्षा आहे. दरम्यान, 'शेतकरी आंदोलनाबाबत आपण का बोलत नाही? असा सवाल रिहानाने ट्वीट मधून केला होता. तिच्या या ट्वीटनंतर भारतातील अनेक सेलिब्रिटींनी राग व्यक्त करत आमच्या देशाच्या अंतर्गत मुद्द्यात नाक खुपसू नको अशा शब्दात उत्तर देत त्यांनी तिला गप्प करण्याचा प्रयत्न केला

First published:

Tags: Corona vaccine, Farmer protest, India, Oxford, Pop star, Social media, Twitter