भारतच नाही तर जगातल्या 14 देशांमध्येही वाढतोय चीनविरुद्ध असंतोष; काय आहेत कारणं?

चीन कोणत्या देशासाठी सर्वांत मोठा खलनायक आहे? हे नुकत्याच झालेल्या एका जागतिक सर्व्हेमधून समोर आलं.

चीन कोणत्या देशासाठी सर्वांत मोठा खलनायक आहे? हे नुकत्याच झालेल्या एका जागतिक सर्व्हेमधून समोर आलं.

  • Share this:
    नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर : अमेरिका (USA) आणि युरोपसह मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये गेल्या दशकात चीनबद्दल (China) नकारात्मक भावना पाहायला मिळते आहे. भारताच्या लडाख प्रांतात (Ladakh face off) चीनने घुसखोरी केल्यामुळे भारताच्या सीमाभागात तणाव निर्माण झाला आणि भारत-चीन संबंध (India China) बिघडले. पण केवळ भारतच नाही, तर जगातल्या अनेक मोठ्या अर्थव्यवस्थांना आता चीन नकोसा झाला आहे. या देशांमध्ये चीनविरोधात असंतोष वाढत आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग (XI Jingping) यांच्या नेतृत्वाबद्दल असो वा चीनचा इतर हेतू असो, कोरोना विषाणू पसरवण्यामध्ये चीनची भूमिका असण्याचा मुद्दा किंवा सर्व जगाच्या आर्थिक गोष्टींशी संबंधित वादाचा मुद्दा असो. जगातील श्रीमंत देशांची चीन बद्दलची भावना नकारात्मक होत चालली आहे. जगातील 14 अग्रगण्य देशांमध्ये नुकत्याच झालेल्या सर्व्हेच्या आधारे प्यू रिसर्चच्या अहवालानुसार असं म्हटलं आहे की या सर्व देशांचा चीनबाबतीत नकारात्मक दृष्टिकोन आहे. ऑस्ट्रेलिया, यूके, जर्मनी, नेदरलॅंड, स्वीडन, यूएस, दक्षिण कोरिया, स्पेन आणि कॅनडा येथे गेल्या दहा वर्षांत चीन विरुद्ध द्वेष सर्वाधिक दिसून आला आहे. चीन कोणत्या देशासाठी सर्वांत मोठा खलनायक आहे? ऑस्ट्रेलियामध्ये चीनविरुद्ध सर्वाधिक नकारात्मक वातावरण पहायला मिळत आहे. सर्व्हेमध्ये ऑस्ट्रेलियातील 81 टक्के लोकांनी चीन बाबतीत नकारात्मक मत दिलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा 24 टक्क्यांनी वाढला आहे. तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यूकेमधील चीन बद्दलच्या नकारात्मक दृष्टिकोनात सुमारे 19 पॉईंट्सनी वाढ झाली आहे. अमेरिकेत मागील वर्षाच्या तुलनेत 13 टक्के अधिक तर डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाल्यापासून चीनबद्दल द्वेष सुमारे 20 टक्‍क्‍यांनी वाढला आहे. तसंच नेदरलँड आणि जर्मनीमध्ये चीनविरुद्ध नकारात्मक दृष्टिकोन हा 15 टक्क्यांनी वाढला आहे त्याचप्रमाणे दक्षिण कोरियामध्ये नकारात्मकतेमध्ये 12 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. तसेच स्पेनमध्ये 10 फ्रान्समध्ये 8 आणि कॅनडामध्ये 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. इटली आणि जपानमध्ये ही नकारात्मकता वाढली आहे परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच कमी टक्केवारी आहे. हा द्वेष का वाढला? कोरोना विषाणूच्या साथीबद्दल चीनवर जितकी टीका झाली आहे ते एक मोठे कारण मानले गेले आहे. सर्व्हे केलेल्या 14 देशांमध्ये सरासरी 61 टक्के लोकांचा असा विश्वास होता कोविड 19 जगात पसरण्याचामध्ये चीनचा हात आहे. शी जिनपिंग यांच्या नेतृत्वबद्दल नाराजी... कोरोनाच्या मुदद्यावर अध्यक्ष जिनपिंग यांच्यावर लोकांचा विश्वास खूपच कमी राहिला आहे. आमचा जिनपिंग यांच्या नेतृत्वावर व त्यांच्या क्षमतेवर विश्वास नाही, असं एकूण 78 टक्के लोकांनी कबूल केलं आहे. जपान आणि स्पेन वगळता इतर सर्व देशांमध्ये आढळलेल्या सर्व आकडेवारीमध्ये अधिक अविश्वास दिसून आला. अविश्वासाची ही आकडेवारी थोड्याशा प्रमाणात नव्हे तर दुप्पट प्रमाणात वाढली असल्याचे दिसून आले. उदाहरणार्थ नेदरलँडमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 17 टक्के अधिक लोकांनी अविश्वास व्यक्त केला. सर्वात मोठा खलनायक कोण ट्रम्प की जिनपिंग? या आकडेवारीतील विशेष बाब म्हणजे जिनपिंग विरोधात अधिक नकारात्मकता दिसून आली असली तरी जिनपिंग अजूनही ट्रम्प यांच्यापेक्षा चांगले आहेत. उदाहरणार्थ जर्मनीतील 78 टक्के लोक जिनपिंगवर विश्वास ठेवत नाहीत परंतु 89 टक्के लोक म्हणाले की त्यांचा ट्रम्पवरसुद्धा विश्वास नाही. ट्रम्प यांच्या तुलनेत जिनपिंग थोडे चांगले आहेत असे मानले जात आहे. परंतु अँगेला मर्केल, इमॅन्युअल मॅक्रॉन आणि बोरिस जॉन्सन या नेत्यांच्या तुलनेत जिनपिंग मागे पडलेले दिसत आहेत. सर्वात अग्रगण्य अर्थव्यवस्था कोणाची? या सर्व प्रकरणांत चीन आणि अमेरिका यांच्यात स्पष्ट स्पर्धा दिसून आली आहे. बहुतेक युरोपीय लोकांचा असा विश्वास होता की चीन आर्थिक वाढीच्या बाबतीत जलद आणि चांगला आहे तर अमेरिकेतील 52 टक्के लोक अमेरिकेची अर्थव्यवस्था सर्वात चांगली आणि अग्रगण्य आहे असे म्हणत होते. covid-19 मुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था डळमळीत होत असताना 14 जून ते 14 ऑगस्ट या दरम्यान केलेल्या प्यू रिसर्चमध्ये दिसून आलं. यात असं दिसून आलं की ज्या देशांनी अर्थव्यवस्थेच्या बाबतीत अमेरिकेपेक्षा चीनला चांगले मानलं त्याच देशांची चीनविरुद्ध नकारात्मक भावना अधिक आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published: