इस्लामाबाद, 2 जून: कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संक्रमणापासून वाचण्यासाठी जगभर मोठ्या प्रमाणात लसीकरण (Corona Vaccination) अभियान सुरु आहे. काही देश स्वत: लशीचे उत्पादन करतायत. तर अन्य देशांनी लस खरेदीला प्राधान्य दिले आहे. या सर्व घडामोडींमध्ये पाकिस्तानमधून (Pakistan) ने एक बातमी येत आहे. पाकिस्ताननं त्यांची कोरोना लस लाँच केली आहे. PakVac असं या लशीचं नावही ठेवलं आहे, मात्र ही लस किती प्रभावी आहे? किती लोकांवर याची चाचणी झाली? या चाचणीचा निकाल काय लागला? ही सर्व माहिती लपवली आहे.
पाकिस्तानच्या नॅशनल कमांड आणि ऑपरेशन सेंटरचे प्रमुख असद उमर यांनी ही लस लाँच केली. पाकिस्तान लवकरच कोव्हीड 19 बाबतचं महत्त्वपूर्ण औषध बनवण्यामध्ये सक्षम होईल, असा त्यांनी दावा केला आहे. त्याचबरोबर नवीन लस कठोर चाचणी, गुणवत्ता आणि पडताळणी या टप्प्यातून तयार झाली आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
चीनचे मानले आभार
कोरोना महामारीच्या काळात चीननं पाकिस्तानच्या मित्राची भूमिका बजावली आहे. पूर्वीपासून मित्र असलेला चीन कोरोना काळातही पाकिस्तानसोबत आहे, असं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर ही लस तयार करणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य विभागाची उमर यांनी प्रशंसा केली असून लवकरच या लशीचे उत्पादन वाढवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.|
अरे देवा! कोरोनानंतर आता H10N3 Bird Flu; जगात चीनमध्येच सापडला पहिला रुग्ण
पाकिस्तान सरकारनं जुलैच्या शेवटच्या महिन्यात असलेल्या ईद-उल-अजहा (बकरी ईद) सणाच्या आसपास लॉकडाऊनमधून लोकांची सुटका व्हावी यासाठी देशात लसीकरण अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी आकडेवारीनुसार पाकिस्तानात 70 लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. यामधील 20 लाख जणांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Coronavirus, Imran khan, Pakistan