कीव, 18 जानेवारी : युक्रेनची राजधानी कीवच्या बाहेर एका किंडरगार्टन जवळ हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. बुधवारी ब्रोव्हरी शहरात हेलिकॉप्टर कोसळल्याने युक्रेनचे गृहमंत्री आणि इतर वरिष्ठ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसह सोळा जणांचा मृत्यू झाला, असे राष्ट्रीय पोलीस प्रमुखांनी सांगितले.
युक्रेनियन अध्यक्षीय कार्यालयाचे उपप्रमुख किरिलो टायमोशेन्को यांच्या हवाल्याने वृत्तसंस्था रॉयटर्सने सांगितले की, विमान कीवच्या ईशान्येस सुमारे 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या ब्रोव्हरी गावात खाली पडले. तर मुले आणि कर्मचारी बालवाडीमध्ये होते. या भीषण अपघातात युक्रेनचे गृहमंत्री आणि इतर वरिष्ठ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसह सोळा जणांचा मृत्यू झाला, असे राष्ट्रीय पोलीस प्रमुखांनी सांगितले.
स्थानिक प्रसारमाध्यमांनी पोलिस प्रवक्त्यांचा हवाला देत सांगितले की, मृत्यू झालेल्यांमध्ये गृहमंत्री डेनिस मोनास्टिरस्की आणि त्यांचे डेप्युटी मंत्री यांचा समावेश आहे. तर कीव प्रादेशिक प्रशासनाचे प्रमुख, ओलेक्सी कुलेबा यांनी त्यांच्या टेलिग्राम चॅनेलवर सांगितले की, सर्व विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना इमारतीतून बाहेर काढण्यात आले आहे. अपघातस्थळी पोलिस आणि डॉक्टर कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश असून त्यापैकी 10 जण रुग्णालयात आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Helicopter, Ukraine news