Home /News /videsh /

Exclusive: इम्रान खान आज पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार? का आली ही वेळ?

Exclusive: इम्रान खान आज पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार? का आली ही वेळ?

CNN-News18 च्या रिपोर्टनुसार, इम्रान खान अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाणार नाहीत. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास पाकिस्तानी लष्कराचाही इम्रान खान यांच्यावरील विश्वास उडाला आहे. सोशल मीडियावर मोहीम राबवून लष्करात फूट निर्माण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

पुढे वाचा ...
    इस्लामाबाद, 27 मार्च : सध्या पाकिस्तान मध्ये मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. आपले सरकार वाचवण्यासाठी धडपडणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) 27 मार्च रोजी इस्लामाबादमधील त्यांच्या जाहीर सभेत राजीनामा देण्याची घोषणा करू शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 मार्च रोजी इम्रान खान यांना फॉरेन फंडिंग प्रकरणात अटक (PTI Foreign Funding Case) होऊ शकते. याआधी रविवारी इस्लामाबादमधील त्यांच्या जाहीर सभेत ते पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊ शकतात आणि पाकिस्तानमध्ये नियोजित वेळेपूर्वी निवडणुका घेण्याची मागणी करू शकतात. पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे (Pakistan Tehreek-e-Insaf) प्रमुख इम्रान खान (PTI Chief Imran Khan) त्यांच्या जाहीर सभेत पुढील निवडणुका होईपर्यंत देशाची सूत्रे काळजीवाहू सरकारकडे सोपविण्याबाबत बोलू शकतात. आमच्या सहयोगी वृत्तवाहिनी CNN-News18 च्या वृत्तानुसार, इम्रान खान अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाणार नाहीत. सूत्रांवर विश्वास ठेवला तर पाकिस्तानी लष्कराचाही इम्रान खान यांच्यावरील विश्वास उडाला आहे. सोशल मीडियावर मोहीम राबवून लष्करात फूट निर्माण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यासोबतच लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा (General Qamar Javed Bajwa) यांचा 2019 मध्ये कार्यकाळ वाढवण्यास झालेल्या विलंबामुळे पाकिस्तानी लष्कराचे अधिकारीही त्यांच्यावर नाराज आहेत. इम्रान सरकारविरोधात 100 खासदारांचा अविश्वास प्रस्ताव बुधवारी इम्रान खान यांनी एका निवेदनात म्हटले होते की, मी कोणत्याही किंमतीत आपल्या पदाचा राजीनामा देणार नाही. उलट आपले सरकार वाचवून विरोधी पक्षांना आश्चर्यचकित करू. मात्र, सध्याचे सरकार ज्या पक्षांसोबत चालत आहे त्यापैकी तीन पक्षांनी अविश्वास ठरावादरम्यान इम्रान खानच्या विरोधात मतदान करण्याचे संकेत दिले आहेत. 8 मार्च रोजी, पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (PML-N) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) च्या सुमारे 100 खासदारांनी विधानसभा सचिवालयात इम्रान खान सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला. पाकिस्तानची कोलमडलेली अर्थव्यवस्था आणि वाढत्या महागाईसाठी विरोधी पक्षांनी इरखान खान आणि त्यांच्या सरकारच्या धोरणांना जबाबदार धरले होते. पाकिस्तानची कोलमडलेली अर्थव्यवस्था आणि वाढत्या महागाईसाठी विरोधी पक्षांनी इरखान खान आणि त्यांच्या सरकारच्या धोरणांना जबाबदार धरले होते. चीनचा ढोंगीपणा! सीमावादावर भारतासोबत 'गोड शब्द', तिकडे तिबेट-झिनजियांगमध्ये उभारतायेत रस्त्यांचे जाळं सरकार वाचवण्यासाठी इम्रान यांना 172 सदस्यांच्या पाठिंब्याची गरज पाकिस्तानच्या 342 सदस्यांच्या नॅशनल असेंब्लीमध्ये (Pakistan National Assembly) अविश्वास प्रस्तावादरम्यान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफला आपले सरकार वाचवण्यासाठी 172 सदस्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता असेल. मात्र, इम्रान खान यांच्या पक्षाच्या सुमारे दोन डझन खासदारांनी त्यांच्याविरोधात आवाज उठवला आहे. दुसरीकडे, इम्रान खान विरोधी पक्षांवर खासदारांच्या घोडेबाजाराचा आरोप करत आहेत. शुक्रवारी विरोधकांच्या गदारोळामुळे इम्रान खान सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव पाकिस्तान नॅशनल असेंब्लीमध्ये मांडता आला नाही. तो 28 मार्चला दुपारी 4 वाजेपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. एव्हिएटर चष्मा, स्लो मोशन स्पीड..काही क्षणात सोडली मिसाइल! VIDEO मध्ये पाहा Kim Jong यांची टशन इम्रान खान आणि त्यांचा पक्ष पीटीआयवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप पाकिस्तानच्या निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या अहवालानुसार, स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने दिलेल्या निवेदनानुसार इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयला 1.64 अब्ज रुपयांचा विदेशी निधी प्राप्त झाला, त्यापैकी 31 कोटी रुपयांहून अधिक विदेशी निधी लपविला गेला. याचा हिशेब ठेवला नाही. पीटीआयला एकट्या परदेशी कंपनीकडून 16 कोटी रुपयांहून अधिक देणग्या मिळाल्या. त्याच वेळी, पीटीआयला 349 परदेशी कंपन्या आणि 88 परदेशी लोकांकडून अवैध देणग्या मिळाल्या. विदेशी निधीचा मोठा हिस्सा रोख स्वरूपात पीटीआयकडे गेला. भ्रष्टाचाराच्या या आरोपांमध्ये इम्रान खान आणि त्यांचे सरकार चांगलेच अडकले आहे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Imran khan, India vs Pakistan

    पुढील बातम्या