जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / विचित्र कारणामुळे मॉडेलने 3 वर्षांपर्यंत केला नाही सेक्स; आता अशी झाली अवस्था

विचित्र कारणामुळे मॉडेलने 3 वर्षांपर्यंत केला नाही सेक्स; आता अशी झाली अवस्था

विचित्र कारणामुळे मॉडेलने 3 वर्षांपर्यंत केला नाही सेक्स; आता अशी झाली अवस्था

या प्रसिद्ध मॉडेललाही सेक्स ही आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट असल्याचा आणि सेक्स आयुष्यातून वजा केल्याने प्रश्न सुटत नसल्याचा साक्षात्कार झाला.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    ऑस्ट्रेलिया, 8 ऑक्टोबर : पाश्चात्त्य देशात (Foreign Countries) सेक्सविषयक खूपच मोकळेपणा आहे. सेक्स (Sex) ही माणसाची नैसर्गिक गरज आहे. त्यामुळे स्त्री किंवा पुरुष दोघांनाही सेक्सचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे तिथे स्त्रीपुरुष दोघेही आपली ही गरज भागवण्यासाठी आपल्याला आवडेल त्या भिन्न लिंगी व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवतात. त्यासाठी परस्परात प्रेमसंबंध असणे, विवाह, संसार अशा चौकटीची गरज नसते. मात्र आयुष्यातील एका टप्प्यावर सेक्स म्हणजे वाईट गोष्ट असं गृहीत धरून तब्बल तीन वर्षे सेक्सविना राहिलेल्या अमरंथा रॉबिन्सन (Amrantha Robinson) या प्रसिद्ध मॉडेललाही सेक्स ही आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट असल्याचा आणि सेक्स आयुष्यातून वजा केल्याने प्रश्न सुटत नसल्याचा साक्षात्कार झाला.आपल्या आयुष्यातील या महत्त्वपूर्ण प्रवासाचा अनुभव तिनं नुकताच शेअर केला आहे. आज तकनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. अमरंथा रॉबिन्सन ही ऑस्ट्रेलियातील (Australia) एक जगप्रसिद्ध मॉडेल (Model) आहे. अत्यंत सुखासीन आयुष्य जगणाऱ्या अमरंथाला वयाच्या 30 व्या वर्षी साधारण 2016 मध्ये आपल्या व्यक्तीगत आयुष्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. कोणत्याही पुरुषाला ती भेटली, तिला तो आवडला की त्याच्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित होत असत, पण थोड्याच दिवसात ते रिलेशनशिप तुटत असे. सतत असं घडू लागल्यानं आपल्याकडे पुरुष आपल्या शरीराकडे आकर्षित होऊन त्यासाठीच येतात असं अमरंथाला वाटू लागलं होतं. या विचाराने ती मनातून दु:खी होऊ लागली होती. आपल्यावर कोणी प्रेम करत नाही, तर फक्त आपल्या शरीरासाठी पुरुष प्रेम करतात या विचाराने ती उदास झाली होती. त्यामुळे तिनं कोणाही पुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवणं बंद केलं. ज्यासाठी आपण पुरुषांकडे आकर्षित होतो, त्या सेक्सलाच आयुष्यातून दूर केलं तर आपण सुखी होऊ असा तिला वाटू लागलं होतं. याच विचारातून ती चर्चमध्ये जाऊ लागली. तिथंही तिला सेक्स म्हणजे वाईट गोष्ट आहे, यामुळे नेहमी दुःखच वाट्याला येतं अशी शिकवण मिळू लागली. त्यामुळे अमरंथाने स्वतःच्या मनावर ताबा ठेवत जवळपास दोन वर्षे विना सेक्सचे आयुष्य व्यतीत केलं. चर्चमध्ये जे सांगितले जाईल तसे ती वागत होती. डेटिंग (Dating) करणंदेखील तिला चुकीचं वाटू लागलं होतं. या सगळ्या काळात भावनिक कल्लोळातही स्थिर रहायला ती शिकली होती. मात्र हळूहळू तिला आपल्या आयुष्यातील नीरसपणाची जाणीव होऊ लागली. हे ही वाचा- Virgin BF चा जोश GF ला पडला भारी! लैंगिक संबंधादरम्यान भिंतीत अडकलं तरुणीचं डोकं या दोन -तीन वर्षांच्या काळात तिनं केवळ सेक्सच नाही तर पुरुषांशी मैत्री करणं, फ्लर्ट करणं, एखाद्या पुरुषाविषयी ओढ वाटल्यानंतर मनात निर्माण होणारी हुरहूर, गोड भावना या सगळ्या गोष्टीही दूर केल्या होत्या. याची तिला जाणीव होऊ लागली. शरीर आणि मन दोन्हीही मरगळल्यासारखे झाले होते. अखेर तिनं स्वतःला एक संधी देण्याचा निर्णय घेतला आणि चर्चमध्ये जाणं बंद केलं. पुन्हा पूर्वीसारखे आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. याकरता ऑनलाइन डेटिंग साईटच्या माध्यमातून एका पुरुषाशी मैत्री केली आणि आयलंडवर सहलीला जाण्याचा बेत आखला. बेत आखताच तिच्या मनात उत्साह निर्माण झाला. तिनं या सहलीत आयुष्य पुरेपूर उपभोगण्याचा निर्णय घेतला. आपलं मन आणि शरीर याचा आवाज ऐकण्याचं ठरवलं. त्याप्रमाणे तिनं या सहलीत तिला जे जे करायचे होते ते केलं. आपल्या आयुष्यातील थरार, उत्साह परत आल्याचं तिला जाणवलं. यातून तिच्या हे स्पष्टपणे लक्षात आलं की सेक्स ही वाईट गोष्ट आहे हे आपणच स्वतः ठरवलं आणि सर्व गोष्टी त्याच्यामुळे होत असल्याचे गृहीत धरून जगत राहिलो ही मोठी चूक होती. आपलं शरीर आणि मन काय सांगतं हे ऐकणं महत्त्वाचं आहे. सेक्स आणि आपल्याला आलेले अनुभव यांचा परस्पर संबध नाही असं आपल्याला या सगळ्या काळात लक्षात आल्याचं तिनं नमूद केलं. आता कोणत्याही गोष्टीला दूर न ठेवता आयुष्य पुरेपूर जगण्याचा निर्णय घेतल्याचं अमरंथा रॉबिन्सन सांगितलं आहे. स्वतःचा एक नवीन शोध या प्रयोगामुळे लागल्याचं तिनं म्हटलं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: model
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात