Home /News /videsh /

Russia-Ukraine War: युक्रेनमधल्या नागरिकांसाठी रशियाचा मोठा निर्णय, काही तासांसाठी युद्धविराम घोषित

Russia-Ukraine War: युक्रेनमधल्या नागरिकांसाठी रशियाचा मोठा निर्णय, काही तासांसाठी युद्धविराम घोषित

Russia has announced a temporary ceasefire: युक्रेनमधून नागरिकांना बाहेर करण्यासाठी रशियानं मोठा निर्णय घेतला आहे. नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी रशियानं 6 तासांचं युद्धविराम घोषित केला आहे.

    कीव, 05 मार्च: एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या 10 दिवसांपासून रशिया- युक्रेनमध्ये (Russia-Ukraine War) युद्ध सुरु आहे. आतापर्यंत या युद्धामुळे युक्रेनचं बरंच नुकसान झालं आहे. रशिया वारंवार युक्रेनवर हल्ले करत आहे. या हल्ल्याचे व्हिडिओ (VIDEO) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रशिया एकामागून एक युक्रेनमधल्या शहरांवर कब्जा करत आहेत. त्यातच रशियानं एक मोठा निर्णय घेतला आहे. युक्रेनमधून नागरिकांना बाहेर करण्यासाठी रशियानं मोठा निर्णय घेतला आहे. नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी रशियानं काही तासांचं युद्धविराम घोषित केला आहे. रशियानं युक्रेनमध्ये युद्धविराम जाहीर केला आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 11.30 वाजता युद्धविराम होणार आहे. जोपर्यंत येथे अडकलेल्या लोकांना बाहेर काढले जात नाही, तोपर्यंत हल्ले करणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. दोन्ही देशांमध्ये दोन वेळा चर्चा झाल्या आहेत. तर तिसऱ्यांदा बैठक आज किंवा उद्या होण्याची शक्यता आहे. अनेक लोक युक्रेनमध्ये अडकले आहेत. यामध्ये भारतीय विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. युक्रेनमध्ये गेल्या 10 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. रशियाकडून सातत्यानं हल्ले होत आहेत. दरम्यान, रशियानं आता युद्धविरामाची भाषा केल्याची माहिती समोर आली. त्यामुळे अशा परिस्थितीत सर्वांसाठी ही मोठा दिलासा देणारी बातमी आहे. रशिया युक्रेनमध्ये24 फेब्रुवारीपासून युद्ध सुरु आहेत. 10 दिवसांनंतर एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.  युक्रेनमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी युद्धविरामाचा निर्णय घेण्यात आला आहे. रशियानं पूर्व युक्रेनवर केलेल्या ड्रोन हल्ल्याचा LIVE VIDEO रशियन सैन्यानं (Russian forces) शनिवारी युक्रेनच्या (Ukraine) बंडखोर झोन डोनेत्स्कमध्ये मोठा हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, पूर्व युक्रेनवर ड्रोन हल्ला करण्यात आला आहे. आयदर बटालियनच्या पोस्टवर हा हल्ला करण्यात आला आहे. ड्रोन हल्ल्यात (drone attack) आयदर बटालियनची चौकी उद्ध्वस्त झाली आहे. युक्रेनची राजधानी कीव आणि चेर्निहाइव्हमध्ये हवाई हल्ल्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आलं आहे. युक्रेनच्या सुमी शहरातील रस्त्यांवर युद्ध सुरू झाल्याचं वृत्त आहे. स्थानिक रहिवाशांना घरी राहण्यास किंवा सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Russia Ukraine

    पुढील बातम्या