मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

भीषण! इस्कॉन मंदिरात गर्दीकडून भक्तांना जबर मारहाण, एकाचा मृत्यू; घटनेचा Live Video आला समोर

भीषण! इस्कॉन मंदिरात गर्दीकडून भक्तांना जबर मारहाण, एकाचा मृत्यू; घटनेचा Live Video आला समोर

या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

    ढाका, 17 ऑक्टोबर : बांग्लादेशात (Bangladesh) हिंदू मंदिरांवरील हल्ले सुरूच आहेत. शुक्रवारीदेखील गर्दीने नाओखाली (Noakhali) भागातील इस्कॉन मंदिरात (ISKCON Temple) तोडफोड केली. मंदिर समितीने दावा केला आहे की, 200 लोकांनी इस्कॉनच्या एका सदस्याची हत्या केली. मृत व्यक्तीचं नाव पार्थो दास असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांचा मृतदेह (Hindu Temple) शव मंदिराजवळील तलावात सापडला. तोडफोन आणि हल्ल्येदरम्याम 17 जणं जखमी झाले आहेत. याशिवाय शनिवारी उपद्रवींनी मुंशीगंजमधील दानियापारा महाश्मशान काली मंदिरात घुसून 6 मूर्ती तोडल्या. हा हल्ला शनिवारी सकाळी 3 ते 4 वाजेदरम्यान झाला होता. यादरम्यान मंदिरात कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती. यासाठी हल्लेखोरांनी न घाबरला मूर्ती खंडीत केल्या. (Devotees beaten by crowd at ISKCON temple one killed Live video of the incident came to the fore) हे ही वाचा-धक्कादायक! कोरोनामुळे 6 लाख लोकांचा मृत्यू; राष्ट्राध्यक्षांवर दाखल होणार खटला का करतायेत हल्ला? मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी चिट्टागावातील कोमिला भागातील दुर्गा मंडळावर झालेल्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला होता. सोशल मीडियावर अफवा उडाली होती, पूजेच्या मंडळात कुरान सापडली आहे. ज्यानंतर अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या. चांदपूर, चिट्टागाव, गाजीपूर, बंदरबन, चंपाईनवाबगंज आणि आणि मौलवीबाजारमध्ये अनेक पूजेच्या मंडपात तोडफोड करण्यात आली होती. पंतप्रधान शेख हसीना यांनी तातडीने कारवाई करण्याचे दिले आदेश बांग्लादेश सरकारने हिंदू मंदिर आणि दूर्गा पूजा मंडळांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात तातडीने कारवाई करणार असल्यासं वचन दिलं आहे.बांग्लादेशचे पंतप्रधान शेख हसीना यांनी सांगितलं की, कोमिलामध्ये झालेल्या घटनांचा तपास केला जात आहे. यात कोणाचीही सुटका केली जाणार नाही. पीएम हसीना म्हणाल्या की, ते कोणत्या धर्माचे आहेत यामुळे काही फरक पडल नाही. त्यांना पकडण्यात येईल आणि शिक्षा देण्यात येईल.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Hindu

    पुढील बातम्या