मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

वडिलांच्या मृतदेहासोबत मुलीचं हॉट Photo Shoot; सोशल मीडियावरही केले शेअर

वडिलांच्या मृतदेहासोबत मुलीचं हॉट Photo Shoot; सोशल मीडियावरही केले शेअर

तरुणीने या कृत्याचं समर्थनही केलं आहे.

तरुणीने या कृत्याचं समर्थनही केलं आहे.

तरुणीने या कृत्याचं समर्थनही केलं आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

वॉशिंग्टन, 29 ऑक्टोबर : वडिलांच्या मृतदेहासमोर ग्लॅमरस पोजमध्ये फोटो शूट (Photo Shoot) करणारी अमेरिकन (American Girl) तरुणी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तरुणीने आपल्या कृत्याचं समर्थन केलं आहे. तरुणीचं म्हणणं आहे की, तिने कोणतीही चूक केली नाही. वडिलांच्या कॉफीनसमोरील तरुणीचा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र टीका केली जात आहे.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, नुकताच फ्लोरिडातील 20 वर्षीय मॉडेल जेने रिवेराने काळ्या रंगाच्या कपड्यात आपल्या वडिलांच्या मृतदेहासमोर ग्लॅमरस फोटो काढला होता. इतकच नाही रिवेराने ते फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होते. ज्यानंतर युजरने असंवेदनशील असल्याचं म्हणत ट्रोल केलं होतं.

तरुणी स्वत:च्या समर्थनार्थ काय म्हणाली..

सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर जेने रिवेराने एनबीसी न्यूजच्या माध्यमातून सांगितलं की, मी केलेली पोस्ट चुकीची नाही. आणि मी त्याच समर्थन करते. रिवेरा पुढे म्हणते की, जर आज तिचे वडील जिवंत असले तर त्यांना तिच्यावर अभिमान वाटला असता. कारण ते माझ्या करियरला सपोर्ट करीत होते.

हे ही वाचा-अजब आजार! अन्नपाण्याऐवजी ही महिला खाते चुना, शेजाऱ्यांच्या भिंतीही करते फस्त

टीकांना दिलं प्रत्युत्तर...

रिवेरा पुढे म्हणाली की, तिने एका चांगल्या हेतूने फोटो काढले आहेत. प्रत्येक व्यक्ती आपआपल्या पद्धतीने अडचणींचा सामना करते. ही माझी पद्धत आहे. जर माझे वडील जिवंत असते तर त्यांनीही याचीही परवानगी दिली असती.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

रिवेराच्या वडिलांचं 11 ऑक्टोबर रोजी वय वर्षे 56 ला निधन झालं. यादरम्यान तिच्या वडिलांचा मृतदेह कॉफीनमध्ये ठेवण्यात आला होता. यावेळी रिवेरा वडिलांच्या मृतदेहासमोर फोटो शूट करू लागली. बोल्ड फोटो शूट करण्यासाठी तिने काळ्या रंगाचा स्लीव असलेला ब्लेजर मिनी ड्रेस घातला होता.

First published:

Tags: Death, Father passed away, Social media