वेल्स, 28 नोव्हेंबर : यूनाइटेड किंगडममधील (UK) वेल्स या देशातून एक हैराण (Shocking News) करणारं वृत्त समोर आलं आहे. येथे एका बेघर महिलेला रात्री छत मिळावं यासाठी स्वत:चं शरीर विकावं लागत आहे. इतकच नाही तर छत मिळावं यासाठी ती कोणा पुरुषासोबतही रात्र घ्यायला तयार होते. असं तिला एक वेळेस नाही तर वारंवार करावं लागलं. (Homeless girl sells body to protect against cold She spends the night with men to get a roof)
नताली कॉक्स नावाची महिला आता गर्भवती आहे. प्रियकरापासून वेगळं झाल्यानंतर तिच्यावर रस्त्यावर राहण्याची वेळ आली. तिचं म्हणणं आहे की, रात्रीच्या थंडीत बाहेर राहणं कठीण होतं. त्यामुळे मला रात्रीच्या वेळी छत हवं असतं. त्यामुळे मी पुरुषांसोबत शारिरीक संबंध ठेवते.
थंडीपासून बचाव करण्यासाठी पुरुषांसोबत घालवते रात्र...
26 वर्षीय नतालीचं कहाणी हैराण करणारी आहे. तिने सांगितलं की, ती खूप दारू पिते. ऊबदारा जागेसाठी तिच्यावर स्वत:ला विकण्याची वेळ आली. रात्रीच्या वेळी एखादी ऊबदार जागा मिळावी यासाठी ती पुरुषांसह शारिरीक संबंध ठेवते. कारण रात्रीच्या वेळी वेल्समध्ये खूप जास्त थंडी असते.
हे ही वाचा-गर्भकळा सुरू झाल्यानंतर खासदार महिला सायकलवर पोहोचली रुग्णालयात
2 महिन्यांपासून गर्भवती आहे नताली..
नताली गेल्या अनेक वर्षांपासून साउथ वेल्स केस्वानसीच्या रस्त्यावर राहते. मात्र गेलं वर्ष तिच्यासाठी कठीण होतं. नताली आपल्या प्रियकरापासून वेगळं झाल्यानंतर रस्त्यांवर राहण्याची वेळ आली. दोन महिन्यांनंतर तिला कळालं की, ती 2 महिन्यांची गर्भवती आहे. नतालीने सांगितलं की, मी रस्त्यांवर जिवंत राहण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र हे अत्यंत कठीण आहे. मात्र मी यातून मार्ग काढला आहे. हा मार्ग अत्यंत कठीण आहे. वेल्सच्या ऑनलाइन रिपोर्टनुसार, नताली 14 वर्षांची असताना स्वानसी येथे गेली होती. तेव्हापासून ती कुटुंबापासून वेगळी राहते. तिने सांगितलं की, रस्त्यावर गुजराण करणं नेहमी कठीण असतं. त्यातही गेलं वर्ष अधिक कठीण होतं. गेल्या वर्षी एकेदिवशी रात्री 2 वाजता कोणी व्यक्तीने तिला पुलावरुन फेकण्याचा प्रयत्न केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Girl pregnant, Uk