मोहोळ, 01 डिसेंबर: सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील पोखरापूर (Pokharapur) येथील एका शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यानं आत्महत्या (12th grade student suicide in school) केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित विद्यार्थ्यानं शाळेच्या वसतीगृहातील टॉयलेटमध्ये गळफास घेत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. सोमवारी रात्री आठच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर, शाळेत एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मोहोळ पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला आहे. संबंधित विद्यार्थ्यानं आत्महत्या का केली? याची माहिती अद्याप समोर आली नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
देवानंद ज्ञानेश्वर भोसले असं आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव असून तो मूळचा करमाळा तालुक्यातील मांगी येथील रहिवासी आहे. पण तो मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता बारावीच्या वर्गात शिकत होता. या शाळेत एकूण 350 मुलं असून यामध्ये 205 मुलं आणइ 145 मुली आहेत. या शाळेत सर्व मुलांची नियमित हजेरी घेतली जाते.
हेही वाचा-जळगाव हादरलं! वृद्ध वडील जीवाच्या आकांताने ओरडत होते अन् मुलगा घाव घालत राहिला
त्यामुळे घटनेच्या दिवशी मृत भोसले हा दिवसभरात घेण्यात आलेल्या हजेरीला उपस्थित होता. पण रात्री साडे आठच्या सुमारास तो वसतीगृहातील एका टॉयलेटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला आहे. खरंतर, रात्री आठ ते साडे आठच्या सुमारास शाळेतील सर्व विद्यार्थी भोजनालयात जेवण करण्यासाठी येतात. यावेळी सर्व विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जाते. दिवसभर उपस्थित असणारा देवानंद मात्र यावेळी गैरहजर होता. त्यामुळे तो नेमका कुठे आहे? यासाठी अन्य विद्यार्थ्यांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली.
हेही वाचा-
यावेळी शाळेतील एका टॉयलेटचा दरवाजा बंद आढळला. टॉयलेटमध्ये आवाज देऊनही आतून कोणत्याही प्रतिसाद देण्यात आला नाही. त्यामुळे दरवाजा तोडून आतमध्ये पाहिलं असता, बारावीत शिकणारा देवानंद गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. देवानंद याने नायलॉनच्या दोरीने टॉयलेटच्या खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शीनी दिसत आहे. या घटनेची माहिती मोहोळ पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Solapur, Student, Suicide case