• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • फाशीच्या आधीच कैदी निघाला कोरोना पॉझिटिव्ह; न्यायाधीशांनी घेतला हा निर्णय

फाशीच्या आधीच कैदी निघाला कोरोना पॉझिटिव्ह; न्यायाधीशांनी घेतला हा निर्णय

एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आलं आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर : सिंगापुरमधून (Singapore News) एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणात एका व्यक्तीला फाशीची शिक्षा (The death penalty) देण्यात येणार होती आणि ऐन वेळी तो कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) असल्याचं समोर आलं. यानंतर अधिकाराही गोंधळात पडले. सिंगापूरमधील वरिष्ठ न्यायालयाने अमली पदार्थाची तस्करीतील आरोपीला शिक्षा सुनावली. (Corona positive before the death penalty Punishment postponed by the judge) मूळ भारतीय वंशाचा असलेला 33 वर्षीय व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. धर्मलिंगम नावाची ही व्यक्ती फाशीपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. धर्मलिंगम याला अमली पदार्थांची तस्करीच्या गुन्ह्याअंतर्गत बुधवारी फाशीची शिक्षा देण्यात येणार होती. न्यू एशियाच्या रिपोर्टनुसार, धर्मलिंगम त्याच्या मृत्यूदंडाच्या शेवटच्या याचिकेवर सुनावणीसाठी न्यायालयान आणण्यात आलं होतं. मात्र यादरम्यान न्यायाधीशांनी न्यायालयात सांगितलं की, धर्मलिंगमला कोरोनाची लागण झाली आहे. हे ही वाचा-अजब प्रथा; विवाहित स्त्रियांची चोरी करतात पुरुष; अनेकांसोबत संबंध ठेवतात महिला न्यायमूर्ती एन्ड्रू फांग, न्यायमूर्ती जूदिथ प्रकाश आणि न्यायमूर्ती कन्नन रमेशच्या एका पीठाने सांगितलं की, सद्य परिस्थितीत मृत्यू दंडाची शिक्षा सुनावणं योग्य नाही. न्यायमूर्ती फांगने सांगितलं की, कैद्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्याला फाशी दिली जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी पुढील सुनावणीपर्यंत त्याची फाशी पुढे ढकलली. मात्र पुढच्या सुनावणीचीही तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. न्यायमूर्तींनी सांगितलं की, जो पर्यंत सुनावणी सुरू राहील, कैद्याला फाशी देता येऊ शकणार नाही.
  Published by:Meenal Gangurde
  First published: