मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

बटाटे झाले Isolate! जगभरात जाणवतोय तुटवडा, फ्रेंच फ्राईजचा दुष्काळ

बटाटे झाले Isolate! जगभरात जाणवतोय तुटवडा, फ्रेंच फ्राईजचा दुष्काळ

जगभरातील फ्रेंच फ्राईजवर सध्या संक्रांत आली आहे. जगातील अनेक देश सध्या बटाट्याच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत. पण बटाटा पडलाय अडकून…

जगभरातील फ्रेंच फ्राईजवर सध्या संक्रांत आली आहे. जगातील अनेक देश सध्या बटाट्याच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत. पण बटाटा पडलाय अडकून…

जगभरातील फ्रेंच फ्राईजवर सध्या संक्रांत आली आहे. जगातील अनेक देश सध्या बटाट्याच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत. पण बटाटा पडलाय अडकून…

  • Published by:  desk news

टोकियो, 11 जानेवारी: जगभरात (Global) सध्या बटाट्यांचा (Potato) तुटवडा (Shortage) जाणवत असून फ्रेंच फ्राईज (French Fries) तयार करणाऱ्या रेस्टॉरंट्सना (Restaurants) याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. जगभरात फ्रेंच फाईज खाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांना अचानक फ्राईज मिळणं बंद झाल्यामुळं बटाट्यांचा प्रश्नाकडं जगाचं लक्ष वेधलं गेलं आहे. जपानपासून केनियापर्यंत अनेक देशांना सध्या बटाट्याचा तुटवडा जाणवायला सुरुवात झाली असून पुरवठा पूर्ववत होईपर्यंत फ्रेंच फ्राईज आणि बटाट्याशी संबंधित इतर पदार्थ बनवणं बंद करण्यात आलं आहे. 

काय आहे समस्या?

जगभरात बटाट्याच्या उत्पादनात कमतरता आली नसली, तरी कोरोनामुळे अनेक जहाजं समुद्रातच अडकून पडली आहेत. त्यामुळे बटाट्यांचा मोठा साठा जहाजात अडकला असून तो हॉटेलपर्यंत पोहोचू शकलेला नाही. त्यामुळे पूर्वीचा साठा संपल्यानंतर आता करायचं काय, असा प्रश्न हॉटेल चालकांना पडला आहे. KFC, McDonalds यासारख्या फ्रेंच फ्राईजसाठी प्रसिद्ध असणाऱ्या चेन्सनी बटाट्याच्या तुटवड्यामुळे सध्या फ्राईज देणं शक्य नसल्याचं जाहीर केलं आहे. 

जपानमध्ये फ्रेंच फ्राईजना ‘सायोनारा’

जपानमधील मॅकडॉनल्ड चेननी फ्रेंच फ्राईजचा पुरवठा सध्या बंद केला आहे. स्मॉल आणि मीडियम अशा दोन साईजमध्ये आतापर्यंत फ्रेंच फ्राईज दिल्या जात असत. मात्र गेल्या महिन्यापासून फ्राईजवर संक्रांत आली असून ग्राहकांना बटाटे येईपर्यंत वाट पाहण्याची विनंती करण्यात आली आहे. 

दक्षिण अफ्रिकेतही तुटवडा

दक्षिण अफ्रिकेत बटाट्याचा चिप्सना विशेष मागणी असते. मात्र पुढील काही दिवसांत बटाट्यांचा पुरवठा पूर्ववत झाला नाही, तर चिप्सचं उत्पादन बंद होईल, असा इशारा चिप्स उत्पादकांनी दिला आहे. यंदा दक्षिण अफ्रिकेत झालेला जोरदार पाऊस आणि पूर यामुळे बटाट्याचं मोठं नुकसान झालं आहे. तर आयात केलेला बटाटा अडकून पडला आहे. 

हे वाचा -

केनियात ‘नो चिप्स’

केनियात प्रत्येक डिशसोबत बटाटा चिप्स खाण्याची नागरिकांना सवय आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून चिप्स देणं रेस्टॉरंट्सनी बंद केलं आहे. त्यामुळे ग्राहकांची चिडचिड वाढली असून सर्वजण बटाट्यांच्या प्रतिक्षेत आहेत. काही काळ बटाटा आणि त्याच्याशी संबंधित पदार्थांवरून लक्ष वळवून ते चिकन, फिश आणि इतर पदार्थांवर केंद्रित करावं, असा सल्ला सध्या रेस्टॉरंट्सकडून ग्राहकांना दिला जात आहे. 

First published:

Tags: Business, Japan, Rest of the World, Restaurant, South africa