• Home
  • »
  • News
  • »
  • videsh
  • »
  • प्रेमात धोका मिळाल्यानं गर्लफ्रेंडनं केला कांड; Ex बॉयफ्रेंडची कार घेऊन रस्त्यावर उतरली अन् दोन रात्रीत...

प्रेमात धोका मिळाल्यानं गर्लफ्रेंडनं केला कांड; Ex बॉयफ्रेंडची कार घेऊन रस्त्यावर उतरली अन् दोन रात्रीत...

Crime news: एका तरुणीनं आपल्या एक्स बॉयफ्रेंडसोबत (Ex Boyfriend) अनोख्या पद्धतीनं बदला (Unique style revenge) घेतल्याची घटना समोर आली आहे.

  • Share this:
    झेझियांग, 14 जुलै: प्रेमात धोका मिळाल्यानंतर बदला घेण्यासाठी प्रियकर (Boyfriend) अथवा प्रेयसी (Girl friend) कधी काय करेल हे सांगता येत नाही. अनेकजण जीवावर उद्धार होऊन बदला घेण्यासाठी आसुसलेले असतात. अनेकदा मारहाण किंवा हत्येपर्यंत प्रेम प्रकरण पोहोचतं. पण एका तरुणीनं आपल्या एक्स बॉयफ्रेंडसोबत (Ex Boyfriend) अनोख्या पद्धतीनं बदला (Unique style revenge) घेतल्याची घटना समोर आली आहे. संबंधित तरुणीला प्रेमात धोका मिळाल्यानंतर तिने आपल्या बॉयफ्रेंडच्या कारनं शहरातील एक-दोन नव्हे तर तब्बल 49 ट्रॅफिक सिग्नल तोडले (break traffic signal for 49 times) आहे. यामुळे एक्स बॉयफ्रेन्डला चांगलाच मनस्ताप झाला आहे. तुरुंगवारीची वेळही त्याच्यावर आली होती. ग्लोबल टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित घटना चीनमधील झेझियांग प्रांतातील आहे. येथील एका तरुणीनं आपल्या एक्स बॉयफ्रेंडसोबतचा बदला घेण्यासाठी त्याच्या ऑडी कारने तब्बल  49 वेळा ट्रॅफिक सिग्नलचं उल्लंघन केलं आहे. त्याच बरोबर भरधाव वेगात वाहन चालवल्याचा गुन्हाही दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सर्वप्रथम संबंधित कारच्या मालकाला बेड्या ठोकल्या आहेत. यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत गर्लफ्रेंडनं केलेला कांड उघड झाला आहे. हेही वाचा-घटस्फोटानंतर खचली पण हार नाही मानली; आता घरात बसून कमावते महिन्याला 41 लाख संबंधित तरुणीचं नाव लू आहे, तर तिच्या एक्स बॉयफ्रेंडचं नाव चेन असं आहे. याप्रकरणी लू ला असं करण्यामागचं कारण विचारलं असता, तिनं सांगितलं की, तिच्या बॉयफ्रेंडनं अन्य एका मुलीसाठी आपल्यासोबत ब्रेकअप केला होता. याचा बदला घेण्यासाठी ही योजना आखली होती. यासाठी झू नावाच्या व्यक्तीनं लू ला मदत केली होती. झूनेच चेनकडून त्याची कार मागून घेतली होती. त्यानंतर दोघांनी संगनमत करत वाहतूक नियमांचं उल्लंघन करण्याचा तडाखा लावला होता. हेही वाचा-मुलींना झटपट पैसे कमवण्याचं आमिष दाखवणाऱ्या सेक्स रॅकेट महिला एजंटला अटक ही कार झू कडे दोन रात्रींसाठी देण्यात आली होती. दरम्यानच्या काळात लूने ह्या कारने शहरात तब्बल 49 वेळा रेड सिग्नल तोडला आहे. यासाठी लू नं झू ला डेटवर जाण्याचं आमिष दिलं होतं. या प्रकरणी लू आणि झू दोघांनी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत. त्यांना कोणती शिक्षा देण्यात आली, याबाबतची माहिती सध्या उपलब्ध होऊ शकली नाही.
    Published by:News18 Desk
    First published: