• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • कधीही भेट नाही, मात्र तरी 20 वर्षांची शिक्षा सुनावलेल्या कैद्यासोबत थाटणार संसार

कधीही भेट नाही, मात्र तरी 20 वर्षांची शिक्षा सुनावलेल्या कैद्यासोबत थाटणार संसार

प्रेम खरंच आंधळं असतं का? ही बातमी वाचून विश्वास बसेल

 • Share this:
  असं म्हणतात प्रेम आंधळं असतं, प्रेमात दुसरं काहीच दिसत नाही, असं म्हटलं जातं. आणि ही बातमी वाचल्यानंतर तुमचा यावर विश्वास बसेल. कैली जैकब नावाच्या एका डच महिलेने कैद्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. या कैद्याचं नाव जेम्स डेंटल आहे आणि तो आता 20 वर्षांची शिक्षा भोगत आहे. तो यूएसच्या ओरेगनच्या कारावासत कैद आहे. 2023 मध्ये शिक्षा पूर्ण होणार जेम्सची शिश्रा 2032 पर्यंत पूर्ण होईल. मात्र कैलीला याबद्दल माहिती असून तरीही ती त्याच्यासोबत लग्न करायला तयार आहे. विशेष म्हणजे कैली जेम्सला कधी भेटली देखील नाही. दोन वर्षांपूर्वी सुरू झालं होतं प्रेम प्रकरण हे प्रेम प्रकरण दोन वर्षांपूर्वी सुरू झालं होतं. यावेळी कैली एका कंपनीत इंटर्न म्हणून काम करीत होती. ती एका वेबसाइटसाठी काम करीत होती. यामध्ये कैद्यांच्या अनुभवावर लेख लिहित होती. हे ही वाचा-पतीच्या मैत्रिणीच्या प्रेमात पडली बायको; लग्नानंतर काही दिवसात झाला खुलासा अन्.. ई-मेलच्या माध्यमातून संबंध वाढले हळूहळू जेम्स आणि कैलीमध्ये ई-मेल, कॉल्स आणि लेटर्सच्या माध्यमातून ओळख वाढली. त्याचं प्रेम प्रकरण कधी सुरू झालं हे त्या दोघांनाही कळालं नाही. कैली जेम्सबद्दल असलेल्या भावना रोखू शकली नाही. आणि दरम्यान जेम्सने तिला प्रपोज केलं. त्याने जेलमधून व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून तिला प्रपोज केलं. यावेळी कैलीने होकार दिला. या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दोघं लग्न करणार आहेत. कैलीने सांगितलं की, जेम्सने तिच्यासाठी जेलमध्येच एक रिंग तयार केली होती. त्यानंतर जेम्सने मित्राकडून कैलीला एक खरी अंगठी तिला पाठवली. सुरुवातीला पालकांकडून होता विरोध जेव्हा कैलीने आई-वडिलांना याबाबत सांगितलं तर त्यांना सुरुवातीला धक्काच बसला. मात्र जेव्हा कैलीच्या पालकांनी जेम्सशी फोनवर बोलले तेव्हा त्यांनी लग्नासाठी होकार दिला. 10 वर्षांपर्यंत एकमेकांपासून राहणार वेगळं लग्नानंतरही दोघांना 10 वर्षांपर्यंत वेगळं राहावं लागेल. 2023 मध्ये जेम्सची तुरुंगातून सुटका होईल. 2012 मध्ये जेम्सने चारजणांची गोळी घालून हत्या केली होती.
  Published by:Meenal Gangurde
  First published: