या देशाच्या PM निवासात वावरतंय भूत? रक्तरंजित इतिहासानंतर 9 वर्षात फार काळ राहिले नाहीत एकही पंतप्रधान

या देशाच्या PM निवासात वावरतंय भूत? रक्तरंजित इतिहासानंतर 9 वर्षात फार काळ राहिले नाहीत एकही पंतप्रधान

2006 ते 2012 या कालावधीत पंतप्रधान असलेले योशीहिको नोडा हे या निवासस्थानात राहणारे शेवटचे पंतप्रधान आहेत. ते डिसेंबर 2012 पर्यंत सत्तेत होते तोपर्यंत त्यांचं वास्तव्य इथंच होतं. त्यानंतर मात्र आतापर्यंत इथं कोणत्याही पंतप्रधानांनी कायमस्वरूपी वास्तव्य केलेलं नाही.

  • Share this:

मुंबई, 02 मे: अत्याधुनिक तंत्रज्ञानात आघाडीवर असलेला देश म्हणून जपानची (Japan)ओळख आहे. मात्र याठिकाणीही भूताखेतांवर (Ghosts) विश्वास ठेवला जातो. धक्कादायक बाब म्हणजे सर्वसामान्य जनताच नव्हे तर अगदी जपानचे पंतप्रधान देखील यावर विश्वास ठेवून आहेत. भूतांच्या भीतीनं जपानमध्ये गेली नऊ वर्षे पंतप्रधानांचं ‘सोरी कोटेई’ (Sori Kotei) हे अधिकृत निवासस्थान (PM House) रिकामं पडून आहे. इथं भूतांचा वावर असल्याची चर्चा असून, याठिकाणी राहण्यास कुणीही पंतप्रधान तयार होत नाही. सध्याचे पंतप्रधान योशिहिदे सुगा देखील (Yoshihide Suga) अवघ्या 8 महिन्यांच्या वास्तव्यानंतर हे अलिशान निवासस्थान सोडून थोड्या अंतरावर असलेल्या डाइट सदस्यांच्या डॉरमेट्रीमधील लहानशा क्वार्टरमध्ये रहायला गेले आहेत. त्यामुळं या निवासस्थानात भुताखेतांचा वावर असल्याच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलं आहे.

जपानच्या पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान असलेले ‘सोरी कोटेई’ हे स्टील आणि काचेचा वापर करून बांधण्यात आलेलं अतिशय सुंदर घर आहे; पण याचा इतिहास रक्तलांच्छित आहे. इथं अनेक खून झाल्याचा इतिहास आहे. 1932 मध्ये सैन्यानं सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तत्कालीन पंतप्रधानांना नौदल अधिकाऱ्यांच्या एका गटानं गोळ्या घातल्या होत्या. चार वर्षानंतर पुन्हा सत्तापालट करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा तत्कालीन पंतप्रधान ओकडा यांच्या मेव्हण्यासह चार लोकांची हत्या करण्यात आली होती. 2001 ते 2006 या कालावधीत पंतप्रधान राहिलेल्या जुनिचिरो कोईजुमी यांनी या समस्येवर उपाय शोधण्यासाठी, इथल्या भूतांना घालवण्यासाठी एका शिंतो पुजाऱ्याला बोलावलं होतं असं सांगितलं जातं.

(हे वाचा-कोरोनाचा धसका! आता नेपाळमध्येही भारतीयांना नो एन्ट्री; 22 प्रवेशद्वारं केली बंद)

2006 ते 2012 या कालावधीत पंतप्रधान असलेले योशीहिको नोडा हे या निवासस्थानात राहणारे शेवटचे पंतप्रधान आहेत. ते डिसेंबर 2012 पर्यंत सत्तेत होते तोपर्यंत त्यांचं वास्तव्य इथंच होतं. त्यानंतर मात्र आतापर्यंत इथं कोणत्याही पंतप्रधानांनी कायमस्वरूपी वास्तव्य केलेलं नाही.

सध्या विरोधी पक्ष नेते असलेल्या योशीहिको नोडा (Yoshihiko Noda) यांनी या रिकाम्या घराच्या देखभालीसाठी करण्यात येणाऱ्या प्रचंड खर्चावर आक्षेप घेतला आहे. कोणीही इथं राहत नसताना या घराच्या देखभालीसाठी दर वर्षी 11 कोटी रुपये खर्च केले जातात. त्यामुळं इथं राहण्यात सध्याचे पंतप्रधान योशिहादे सुगा यांना काय अडचण आहे असा प्रश्न नोडा यांनी उपस्थित केला आहे.

First published: May 2, 2021, 3:35 PM IST

ताज्या बातम्या