Home /News /videsh /

कुठेही जाण्यासाठी Vaccine Pass बंधनकारक, लसीकरण विरोधकांना ‘फ्रेंच’ दणका

कुठेही जाण्यासाठी Vaccine Pass बंधनकारक, लसीकरण विरोधकांना ‘फ्रेंच’ दणका

तुम्ही फ्रान्समध्ये असाल तर कुठंही जाण्यासाठी आता सरकारी पास दाखवणं बंधनकारक असणार आहे. जाणून घेऊया, या नव्या कायद्याविषयी.

    पॅरिस, 17 जानेवारी: यापुढे कुठेही जाण्यासाठी व्हॅक्सिन पास (Vaccine Pass) बंधनकारक (Mandatory) करणारा कायदा अखेर फ्रेंच सरकारनं (French Government) पारित (Approved) केला आहे. लवकरच हा कायदा देशभर लागू होणार असून कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील हे एक महत्त्वाकांक्षी पाऊल मानलं जात आहे. फ्रान्समध्ये कोरोना लसीकरणाला विरोध करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या सर्वांना ताळ्यावर आणण्यासाठीच हे पाऊल उचलल्याचं फ्रेंच सरकारचं म्हणणं आहे.  काय आहे कायदा? फ्रान्समध्ये सध्या कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करण्यासाठी कोरोना निगेटिव्ह असल्याचं सर्टिफिकेट द्यावं लागतं. मात्र आता सार्वजनिक बस, ट्रेन, रेस्टॉरंट, सरकारी कार्यालयं, खासगी कार्यालयं अशा कुठल्याही ठिकाणी प्रवेश करण्यासाठी ‘Vaccine पास’ जवळ बाळगणं बंधनकारक करण्यात आलं आहे. हा पास दाखवल्याशिवाय कुठेही नागरिकांना प्रवेश मिळू शकणार नाही.  निवडणुका आणि कायदा या वर्षीच्या एप्रिल महिन्यात राष्ट्राध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन निवडणुकांना सामोरे जात आहेत. त्यापूर्वी हा कायदा अंमलात यावा, यासाठी ते प्रयत्नशील होते. या कायद्याला विरोधी पक्षाने तीव्र आक्षेप घेतले होते. त्यानंतर त्यातील काही तरतुदी बदलण्यात आल्या होत्या. मात्र कोरोना लसीकरणाला विरोध करणाऱ्या नागरिकांमुळे फ्रान्समध्ये वारंवार कोरोनाच्या लाटा येत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. काही निवडक लोकांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात अपयश येत असून नवा कायदा हेच त्यावरचं जालीम औषध ठरेल, असा विश्वास राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी व्यक्त केला आहे.  हे वाचा - बहुमतानं कायदा मंजूर हा कायदा वादग्रस्त ठरला असला तरी तो बहुमतानं मंजूर झाला. 215 विरुद्ध 58 अशा भरघोस मतांनी या कायद्याला समर्थन मिळालं. फ्रान्समध्ये सध्या 78 टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे, तर नुकतीच पाचव्या लाटेला सुरुवात झाली असून दैनंदिन सापडणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या आता 3 लाखांवर पोहोचली आहे. 
    Published by:desk news
    First published:

    Tags: Corona vaccination, France, Law

    पुढील बातम्या