मराठी बातम्या /बातम्या /विदेश /दुसऱ्यांदा फ्रान्सच्या अध्यक्षपदी बसलेल्या मॅक्रॉन यांच्यासमोर 'ही' आहेत मोठी आव्हानं

दुसऱ्यांदा फ्रान्सच्या अध्यक्षपदी बसलेल्या मॅक्रॉन यांच्यासमोर 'ही' आहेत मोठी आव्हानं

इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) दुसऱ्यांदा फ्रान्सचे (France) राष्ट्राध्यक्ष बनण्यात यशस्वी ठरले आहेत. दुसऱ्या टप्प्यात त्यांनी उजव्या विंगच्या मरीन ले पेन यांचा पराभव केला. पण, यावेळी विजयाचे अंतर थोडे कमी झाले आहे.

इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) दुसऱ्यांदा फ्रान्सचे (France) राष्ट्राध्यक्ष बनण्यात यशस्वी ठरले आहेत. दुसऱ्या टप्प्यात त्यांनी उजव्या विंगच्या मरीन ले पेन यांचा पराभव केला. पण, यावेळी विजयाचे अंतर थोडे कमी झाले आहे.

इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) दुसऱ्यांदा फ्रान्सचे (France) राष्ट्राध्यक्ष बनण्यात यशस्वी ठरले आहेत. दुसऱ्या टप्प्यात त्यांनी उजव्या विंगच्या मरीन ले पेन यांचा पराभव केला. पण, यावेळी विजयाचे अंतर थोडे कमी झाले आहे.

पॅरिस, 26 एप्रिल : सध्याचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांनी फ्रान्सच्या अध्यक्षीय निवडणुकीत (Presidential Election of France) विजय मिळवला असून ते दुसऱ्यांदा या पदावर विराजमान होण्यात यशस्वी ठरले आहेत. यावेळी मॅक्रॉन यांचा विजय सोपा नव्हता. त्यांना पुन्हा एकदा उजव्या विचारसरणीच्या मरीन ले पेन (Marine Le Pen) यांनी आव्हान दिलं होतं. यावेळी मॅक्रॉन यांच्या विजयाचं अंतर थोडे कमी होतं, यावरून ही निवडणूक त्यांच्यासाठी किती कठीण होती हे दिसून येते. पण मॅक्रोन यांच्यासाठी पुढचा काळ आणखी कठीण आहे. त्यांना त्यांच्या धोरणांमध्ये अनेक बदल करावे लागतील आणि तेही लवकरात लवकर.

मॅक्रॉन यांच्या विधानावरुन अनेक गोष्टी स्पष्ट

त्यांच्या विजयानंतर मॅक्रॉन जे म्हणाले ते देखील दर्शवते की पुढील काळ त्यांच्यासाठी आव्हानात्मक आहे. ते म्हणाले, “मला माहित आहे की अनेक देशवासीयांनी माझ्या विचारांना पाहून मत दिलं नाही तर उजव्या विचारसरणीला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी दिलं आहे. त्यामुळे या विजयामुळे माझ्यावर जबाबदारी वाढली आहे.

मॅक्रॉन यांच्यावर सगळेच खूश नव्हते

फ्रान्समधील निवडणुकीपूर्वीही असे मानले जात होते की मॅक्रॉन यांच्या कार्यपद्धती आणि त्यांच्या कार्यक्रमांवर बरेच लोक नाराज आहेत. परंतु, तरीही त्यांनी त्यांना मतदान केले. मॅक्रॉन यांच्या बाजाराभिमुख सुधारणांना फ्रान्समध्ये जोरदार विरोध झाला होता. ज्यात श्रम बाजाराचे उदारीकरण आणि सार्वजनिक रेल्वे कंपनी SNCF च्या सुधारणांचा समावेश आहे.

सर्व विरोधानंतरही अध्यक्षपदी

पिवळ्या बनियान चळवळीला सामोरे जाण्यात मॅक्रॉन प्रभावी नव्हते किंवा त्यातून निर्माण झालेल्या संतापाचा सामना करण्यातही ते प्रभावी नव्हते. या आंदोलनात सामाजिक न्यायाची मागणी करणाऱ्यांनी अनेक महिने फ्रान्सचे गल्ल्या आणि रस्ते बंद केले होते. त्यांनी फ्रान्सच्या लोकांसाठी 48 अब्ज युरोची उत्तम जीवन योजना सुरू केली आणि नंतर बंद केली. या सर्व गोष्टींनंतरही ते अध्यक्षपदी विराजमान झाले.

किंमत चुकवावी लागली

मात्र, त्यानंतरही मॅक्रॉन यांनी या सगळ्याची किंमत चुकवली आहे. उजव्या विचारसरणीचे उत्थान आणि सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी प्रजासत्ताक आघाडी स्थापन करण्यात आली होती. ज्यामध्ये अनेक लोकशाहीवादी पक्ष आणि मतदारांचा समावेश होता, आता विघटित होऊ लागली आहे. बरेच लोक पेन यांच्या विरोधात होते, तरीही मॅक्रॉन यांना मत द्यायला तयार नव्हते. अशा लोकांनी पहिल्या टप्प्यात दुसर्‍या कोणाला तरी मतदान केले होते, ज्यात जीन-लुक मिलनकॉन यांचे समर्थकही होते. ज्यांना पहिल्या टप्प्यात केवळ 22 टक्के मते मिळाली होती.

फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा इमॅन्युएल मॅक्रॉन, मरीन ले पेन यांचा पराभव करत जिंकली निवडणूक

सर्वांचा पाठिंबा मिळाला नाही

यावेळी मॅक्रॉन यांच्यासमोर उजव्या पक्षाला रोखण्याचे खडतर आव्हान असेल. मॅक्रॉन यांनी पहिल्या टप्प्यात त्यांच्यासोबत नसलेल्या अनेक मतदारांचा पाठिंबा मिळवला, पण तरीही अनेक मतदार मॅक्रॉन यांच्या विरोधात होते किंवा नाराज होते. यामुळेच अनेकांनी मॅक्रॉन किंवा पेनमधील एकाची निवड करण्याऐवजी मतदानात भाग घेतला नाही.

ते करणे आवश्यक

त्यामुळेच ते पुन्हा निवडून आल्यानंतर त्यांना पुन्हा डाव्या विचारसरणीच्या समर्थकांना खूश करण्याच्या योजना आणाव्या लागतील. त्यांना जनतेपर्यंत हा संदेश पोहचवावा लागले की ते त्यांच्याप्रती संवेदनशील आहेत, सर्वांना बरोबर घेऊन जाणार असून ते स्वीकारार्ह पर्याय आहेत. त्यांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं लागेल. तरच लोकांचं समर्थन मिळेल.

जर मॅक्रॉन हे सर्व करू शकत नसतील, तर ते फक्त उजव्या विचारसरणीच्या पक्षांना बळकट करतील. पुढची निवडणूक मॅक्रॉन विरुद्ध कोणीही किंवा कोणीही विरुद्ध ले पेन अशी होईल. फ्रान्समध्ये या वर्षी जूनमध्ये संसदीय निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत उजव्या पक्षाला रोखण्याला त्यांचे प्राधान्य असेल. त्यांची सर्व विधाने या तयारीकडे बोट दाखवत आहेत. पण मॅक्रॉन यांच्याकडे जास्त वेळ नाही.

First published:

Tags: France