मराठी बातम्या /बातम्या /विदेश /फ्रान्सची इस्लामी कट्टरतावादावर कारवाई, तिरस्कार पसरवणारी मशीद केली बंद

फ्रान्सची इस्लामी कट्टरतावादावर कारवाई, तिरस्कार पसरवणारी मशीद केली बंद

अतिरेकी विचार पसरवणाऱ्या एका मशिदीवर फ्रान्स सरकारनं कारवाई केली आहे. ही मशीद बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अतिरेकी विचार पसरवणाऱ्या एका मशिदीवर फ्रान्स सरकारनं कारवाई केली आहे. ही मशीद बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अतिरेकी विचार पसरवणाऱ्या एका मशिदीवर फ्रान्स सरकारनं कारवाई केली आहे. ही मशीद बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पॅरिस, 28 डिसेंबर: मुस्लीम (Muslim) बांधवांना भडकाऊ भाषणं (hate speeches) देऊन त्यांची माथी भडकवली जात असल्याच्या कारणावरून एक मशीद बंद (Mosque closed) करण्याचा निर्णय़ फ्रान्स सरकारनं (France government) घेतला आहे. फ्रान्सच्या उत्तर भागात असणाऱ्या एका मशिदीत  इमामांकडून तिथं जमणाऱ्या अनुयायांना कट्टरतावादी भाषणं दिली जात असल्याचं दिसून आलं. त्यामुळे देशातील नागरिकांच्या मनात इतर नागरिकांबाबत वैरभावना निर्माण करणं आणि दहशतवादी विचारांना खतपाणी घालणं, असे आरोप ठेवत ही मशीद बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे आहे कारण

फ्रान्सची राजधानी पॅरिसपासून साधारण 100 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मशिदीत नुकतीच एका नव्या इमामांची नियुक्ती करण्यात आली होती. हे इमाम नव्यानेच इस्लाम धर्मात दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या मशिदीत मुस्लीम धर्मियांना ख्रिश्चन धर्म, ज्यू धर्म आणि इतर धर्मांबाबत भडकावलं जात असल्याचं प्रशासाच्या लक्षात आलं. देशात एकता आणि सलोखा राखणं गरजेचं असल्याचं सांगत अत्यावश्यक कारवाई म्हणून ही मशीद पुढील 6 महिन्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

कट्टरतावादाला विरोध

फ्रान्स सरकारनं कट्टरतावादाला तीव्र विरोध दर्शवला आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी या मशिदीत सलग काही दिवस हजेरी लावून इथल्या घडामोडींचा आढावा घेतला. त्यावेळी इस्लामचा प्रचार करण्याच्या आडून इतर धर्मियांविषयी तेढ पसरवली जात असल्याचं दिसून आलं. मुस्लीम सोडून इतर सर्व धर्माचे नागरिक हे दुश्मन आहेत, फ्रान्समधील पाश्चिमात्य संस्कृतीविरोधात आपल्याला लढा द्यायचा आहे, दुश्मनांचा खात्मा करणं हे आपलं ‘कर्तव्य’ आहे, वगैरे भाषा वापरली जात असल्याचं दिसून आल्यावर हा निर्णय घेण्यात आला.

हे वाचा -

शांततेसाठी निर्णय

हा निर्णय देशाच्या शांततेसाठी घेण्यात आला असून दहशतवादाला नेहमीच आपला विरोध राहिल, असं फ्रान्सनं म्हटलं आहे. कट्टरतावाद हा कुठल्याही देशासाठी किती घातक असू शकतो, याची अनेक उदाहरणं जगानं पाहिली आहेत. त्यामुळे कुठल्याही अतिरेकी धार्मिक विचारांना थारा देणं धोक्याचं असल्याचं वारंवार सिद्ध झालं आहे.

First published:
top videos

    Tags: France, Masjid, Muslim