मुंबई, 28 डिसेंबर: देशात कोरोनाचा प्रदुर्भाव गेल्या दीड वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून सुरु आहे. त्यामुळे शाळा आणि कॉलेजेस (School and colleges) बंद करण्यात आले होते. सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या (Online education) माध्यमातून शिक्षण दिलं जात होतं. मात्र गेल्या काही महिन्यांमधील कोरोनाची समाधानकारक स्थिती बघता हळूहळू शाळा आणि कॉलेजेस सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शाळा कॉलेजेस सुरु झाले होते. मात्र आता कोरोनच्या नव्या व्हेरिएन्टनं परत चिंता वाढवली आहे.
राज्यात बघता बघता Omicron चे रुग्ण वाढत चालले आहेत. जर Omicron असाच राज्यात (Omicron patients in Maharashtra) वाढत राहिला तर सुरु करण्यात आलेल्या शाळा पुन्हा बंद (Closing of schools in Maharashtra) कराव्या लागतील असा इशारा काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी दिला होता. आता मंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा शाळा कॉलेजेस बंद (Reclosing of colleges due to corona) होणार का याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
भारतातही आता 4 दिवसांचा आठवडा? नवीन लेबर कोडचा पगारावर काय होणार परिणाम? वाचा
महाराष्ट्रात बघता बघता Omicron रुग्णांची संख्या (Omicron patients in Maharashtra) तब्बल 167 वर पोहोचली आहे. दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे राज्य सरकार आता सतर्क झालं आहे. पुढच्या पंधरा दिवसांमधील एकूण स्थिती बघूनच शाळा आणि कॉलेजेस बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल असं पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Minister Aditya Thackeray) यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे.
राज्यात अहमदनगर, सांगली आणि इतर काही जिल्ह्यांमधील शाळांच्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शाळा आणि कॉलेजेस ऑफलाईन सुरु करून विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणं पर्याय नसेल एवढं मात्र नक्की. " “लोकांना मास्क घालण्याची गरज आहे. आतापासून पंधरा दिवसांची परिस्थिती पाहता शाळा-कॉलेजबाबत निर्णय घेतला जाईल. आता सुट्टीचा हंगाम आहे. त्यामुळे पर्यटन परिसर बंद करणं ही चांगली कल्पना ठरणार नाही." असंही आदित्य ठाकरे यांनी म्हंटलं आहे.
Career Tips: तुम्हालाही रेल्वेमध्ये TC होऊन सरकारी नोकरी हवीये? असा मिळेल Job
त्यात आता राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शाळांमध्येच विद्यार्थ्यांना लस देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र पुढील पंधरा दिवसात पुन्हा शाळा आणि कॉलेजेस बंद करण्यात आलेत तर विद्यार्थ्यांना लसीकरण केंद्रांवर जाऊनच लस घ्यावी लागणार आहे. एकूणच शाळांसाठी, विद्यार्थ्यांसाठी पुढील पंधरा दिवस महत्त्वाचे असणार आहेत. राज्यातील शाळा आणि कॉलेजेस तसेच सुरु ठेवायचे की बंद करायचे याबाबत निर्णय यादरम्यान घेण्यात येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aaditya thackeray, Colleges closed, Schools closed, महाराष्ट्र