मराठी बातम्या /बातम्या /विदेश /विमानं जमिनीवर, गाड्यांना बंदी! जोरदार बर्फवृष्टीनं सर्वात बिझी विमानतळ ‘Flight Mode’वर

विमानं जमिनीवर, गाड्यांना बंदी! जोरदार बर्फवृष्टीनं सर्वात बिझी विमानतळ ‘Flight Mode’वर

गेल्या तीन दिवसांपासून जोरदार बर्फवृष्टी होत असल्यामुळे जगातील सर्वात मोठं आणि व्यस्त विमानतळ असणाऱ्या इस्तंबूलमधील विमानसेवा ठप्प करण्यात आली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून जोरदार बर्फवृष्टी होत असल्यामुळे जगातील सर्वात मोठं आणि व्यस्त विमानतळ असणाऱ्या इस्तंबूलमधील विमानसेवा ठप्प करण्यात आली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून जोरदार बर्फवृष्टी होत असल्यामुळे जगातील सर्वात मोठं आणि व्यस्त विमानतळ असणाऱ्या इस्तंबूलमधील विमानसेवा ठप्प करण्यात आली आहे.

इस्तंबूल, 25 जानेवारी: जोरदार बर्फवृष्टीमुळे (Snowfall) जगातील सर्वात बिझी विमानतळ (Busy airport) असणाऱ्या इस्तंबूलमधील (Istanbul) सर्व व्यवहार (All operations) ठप्प झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून विमानतळ (Airport) आणि शहर परिसरावर बर्फाची चादर पसरली आहे. सोमवारपासून या विमानतळावरची सेवा ठप्प करण्यात आली आहे, तर शहरातील रस्त्यांवर खासगी गाड्यांना प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी प्रशासनाकडून रस्ते साफ करण्याचं आणि रस्त्यावरील बर्फ हटवण्याचं काम सुरु करण्यात आलं असून वारंवार रस्ते ब्लॉक होत असल्याचं चित्र आहे. 

गेल्या आठवड्यापासून बर्फवृष्टी

गेल्या आठवड्यापासून टर्कीतील विविध भागात बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. साधारण 1 कोटी 60 लाख लोकसंख्या असलेल्या या देशाला जोरदार बर्फवृष्टीनं गारठवून टाकलं आहे. जगातील सर्वात मोठं आणि सर्वात व्यस्त एअरपोर्ट असणाऱ्या इस्तंबूल विमानतळावरील सर्व धावपट्ट्यांवर बर्फ साचला असल्याचं फूटेजमधून स्पष्ट दिसत आहे. विमानतळावर उभी असणारी सर्वच्या सर्व विमानं जागच्या जागी उभी असल्याचं सरकारनं जारी केलेल्या फोटोंमधून दिसून येत आहे. 

कारना बंदी

इस्तंबूलचे गव्हर्नर अली येरलीकाया यांनी खासगी कारना रस्त्यावर येण्यास मनाई करण्याचे आदेश दिले आहेत. विमानतळ परिसर आणि शहराच्या वेगवेगळ्या भागात सध्या बर्फ हटवण्याचं काम हाती घेण्यात आल्यामुळे रस्त्यावर कार घेऊन येऊ नये, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. 

सरकारी सुट्टी जाहीर

टर्कीतील अनेक कार्यालयांना सध्या सरकारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कमीत कमी नागरिकांनी रस्त्यावर यावं, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. टर्कीमध्ये बर्फवृष्टी नवी नसली तरी यंदा सलग तीन दिवस बर्फ पडत असून त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. टर्कीतील अँटालया शहरातही जोरदार बर्फवृष्टी झाली असून गेल्या 29 वर्षांत पहिल्यांदाच या भागात बर्फ पडल्याची नोंद झाली आहे. 

हे वाचा -

हजारो प्रवासी रखडले

इस्तंबूल विमानतळ आणि इतरत्र सुमारे 4600 प्रवासी रखडले आहेत. त्यांच्या तात्पुरत्या राहण्याची आणि अन्नाची सुविधा तयार करण्यात आली असून बर्फवृष्टी थांबताच वाहतूक पूर्ववत करण्यात येईल, अशी माहिती विमानतळ प्रशासनानं दिली आहे.

First published:

Tags: Airplane, Car, Domestic flight, Snow, Turkey