'हो, माझी कोव्हीड-19 ची टेस्ट झाली', होम क्वारन्टाइन झाल्यानंतर पहिल्यांदाच बोलले जितेंद्र आव्हाड

'हो, माझी कोव्हीड-19 ची टेस्ट झाली', होम क्वारन्टाइन झाल्यानंतर पहिल्यांदाच बोलले जितेंद्र आव्हाड

आव्हाड यांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वत:ला क्वारन्टाइन करून घेतलं आहे.

  • Share this:

ठाणे, 13 एप्रिल : राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. 'सुदैवाने माझ्या टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तरीही प्रोटोकॉलनुसार मला आता किमान 14 दिवस होम क्वारन्टाइन व्हावे लागणार आहे. जी की अत्यावश्यक बाब आहे,' अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

'जितेंद्र आव्हाड आणि इतर काही लोक हे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आले. त्यानंतर आव्हाड यांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वत:ला क्वारन्टाइन करून घेतलं आहे. ठाण्यातील या कोरोना पॉझिटिव्ह PSI च्या संपर्कात अनेक पत्रकारही आले आहेत. त्या सर्वांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यातील एक पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. त्यानंतर आता सर्वांना क्वारन्टाइन करण्यात आलं आहे,' अशी माहिती आज सकाळी समोर आली. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

'मी पुन्हा येईन...', नक्की काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

"हो,काल माझी देखील कोव्हीड 19 ची टेस्ट करण्यात आली.माझ्या सोबत काम करणाऱ्या एका पोलीस सहकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत. यात माझा देखील समावेश होता. माध्यमात या बातम्या आल्या आणि अनेकांचे फोन आणि मेसेजेस येत आहेत. आपण माझ्यावर जे प्रेम आणि विश्वास नेहमीच दाखवता त्याबद्दल मी आपला आभारी आहे."

हेही वाचा - महाराष्ट्रात 15 ते 20 एप्रिलमध्ये कोरोनाचा सर्वाधिक धोका, मुख्यमंत्री घेणार मोठा निर्णय

"दुःख एका गोष्टीच वाटत की,लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर कळवा मुंब्रा भागात मी अन्नाची पाकीट गरजूंना वाटत होते.त्या मी रोज स्वतःच्या निरीक्षणाखाली बनवून घेत होतो.आता पुढील 14 दिवस ते शक्य नाही. तरी माझे सहकारी हे काम थांबवणार नाहीत, याची मी हमी देतो."

"कळवा,मुंब्रा,सोलापूर आणि माझ्या महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना विनंती आहे की,कृपा करून घरी बसा.आणि आपली तशीच आपल्या परिवाराची काळजी घ्या. येत्या 7 दिवसात पुन्हा एकदा कोरोना टेस्ट करण्यात येईल.आणि मला विश्वास आहे की,या टेस्ट चा रिपोर्ट देखील निगेटिव्ह येऊन,लवकरात लवकर तुमच्यामध्ये "मी पुन्हा येईन..!"

First published: April 13, 2020, 4:31 PM IST

ताज्या बातम्या