• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • वेगानं बदलतंय आशियातलं राजकारण, चीन आणि तालिबानची पहिली Diplomatic बैठक, चर्चेबाबत कमालीची गुप्तता

वेगानं बदलतंय आशियातलं राजकारण, चीन आणि तालिबानची पहिली Diplomatic बैठक, चर्चेबाबत कमालीची गुप्तता

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबाननं (Taliban) सत्ता स्थापन केल्यानंतर चीन (China) आणि तालिबान यांच्यात पहिली डिप्लोमॅटिक बैठक (first diplomatic meeting) बुधवारी पार पडली.

 • Share this:
  काबुल, 25 ऑगस्ट : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबाननं (Taliban) सत्ता स्थापन केल्यानंतर चीन (China) आणि तालिबान यांच्यात पहिली डिप्लोमॅटिक बैठक (first diplomatic meeting) बुधवारी पार पडली. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानंच (China's external affair ministry) या बैठकीबाबत माहिती जाहीर केली असून बैठकीतील मुद्दे मात्र उघड करण्यात आलेले नाहीत. एकीकडे भारताने अफगाणिस्तानमधील दूतावास बंद केला असताना चीन आणि तालिबानची जवळीक मात्र वाढत असल्याचं चित्र आहे. चीन आणि रशिया तालिबानच्या जवळ अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर चीन आणि रशियाने तालिबान सरकारचं स्वागत केलं असून त्यांच्यासोबत धोरणात्मक चर्चांना सुरुवात केली आहे. भारत आणि अमेरिकेनं अफगाणिस्तानमधील दूतावास बंद केलं असून कर्मचाऱ्यांना मायदेशी बोलावलं आहे. तर चीन आणि रशियानं मात्र आपला दूतावास सुरूच ठेवला असून तालिबानसोबत संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने पावलं उचलायला सुरुवात केली आहे. अशी झाली बैठक चीनच्या अफगाणिस्तानमधील राजदूतांनी तालिबानच्या पॉलिटिकल विंगचे प्रमुख अब्दुल सलाम हनाफी यांची भेट घेऊन अनेक मुद्द्यावर चर्चा केली. या बैठकीतील तपशील दोन्ही पक्षांकडून गुप्त ठेवण्यात आले आहेत. अफगाणिस्तानमध्ये स्थिर आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताचं सरकार यावं, अशी आपली अपेक्षा असल्याचं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. चीननं अफगाणिस्तानकडे आपलं लक्ष केंद्रीत केलं असून तालिबानसोबत संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेनं पावलं टाकायला सुरुवात केल्याचा हा मोठा पुरावा मानला जात आहे. हे वाचा -मोठी बातमी! तालिबानसोबत मोदी सरकार करणार चर्चा? देशहित लक्षात घेऊन होणार निर्णय भारतासाठी चिंता एकीकडे तालिबान आणि पाकिस्तान यांचे पूर्वापार घनिष्ट संबंध आहेत. तालिबानचे अनेक नेते पाकिस्तानात राहून अफगाणिस्तानचा कारभार हाकत असल्याचं यापूर्वी अनेकदा सिद्ध झालं आहे. तालिबानच्या मदतीनं आम्ही काश्मीर जिंकून घेऊ, असं धक्कादायक वक्तव्य नुकतंच पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षातील ज्येष्ठ नेत्याने केलं होतं. दुसरीकडे रशिया आणि चीन यांनीदेखील तालिबानशी जवळीक वाढवली असून व्यापारी आणि सामरिक हित जोपासायला सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत भारत तालिबानबाबत नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. अद्याप भारतानं तालिबानमधील सरकारला अधिकृतरित्या मान्यता दिलेली नाही. मात्र तालिबानवर अधिकृतरित्या टीकादेखील केलेली नाही.
  Published by:desk news
  First published: