मराठी बातम्या /बातम्या /विदेश /दक्षिण आफ्रिकेत अंधाधुंद गोळीबार, आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू

दक्षिण आफ्रिकेत अंधाधुंद गोळीबार, आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू

 घटनास्थळी सापडलेल्या काडतुसांच्या संख्येवरून असे सूचित होते की ही गुन्हेगारांची एक मोठी टोळी होती.

घटनास्थळी सापडलेल्या काडतुसांच्या संख्येवरून असे सूचित होते की ही गुन्हेगारांची एक मोठी टोळी होती.

घटनास्थळी सापडलेल्या काडतुसांच्या संख्येवरून असे सूचित होते की ही गुन्हेगारांची एक मोठी टोळी होती.

जोहान्सबर्ग, 10 जुलै : दक्षिण आफ्रिकेतून एक मोठी बातमी समोर आली आहे. (Big News From South Africa) दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग (Johansburg South Africa) येथे सोवेटो टाउनशिपमधील एका बारमध्ये जोरदार गोळीबार झाला. या घटनेत 14 लोकांचा मृत्यू (14 people died) झाला आहे. तर इतर तिघांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. (Firing in South Africa) बारमध्ये झालेल्या या भीषण हल्ल्यामागील नेमके कारण काय, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

नेमकं काय घडलं - 

पोलिसांनी सांगितले की, शनिवारी रात्री उशिरा लोकांचा एक गट मिनीबस टॅक्सीत आला आणि त्यांनी बारमध्ये गोळीबार केला. पोलिसांनी रविवारी सकाळी मृतदेह बाहेर काढून हा भीषण गोळीबार का झाला, याचा तपास सुरू केला आहे. या घटनेतील तीन गंभीर जखमी आणि आणखी एक जखमी व्यक्तीला क्रिस हानी बरगवनथ रुग्णालयात नेण्यात आले आहे.

गौतेंग प्रांताचे पोलीस आयुक्त, लेफ्टनंट जनरल इलियास मावेला यांनी सांगितले की, घटनास्थळी सापडलेल्या काडतुसांच्या संख्येवरून असे सूचित होते की ही गुन्हेगारांची एक मोठी टोळी होती. ही टोळी बारमध्ये घुसली आणि त्यांनी अंधाधुंद गोळीबार केला. त्यांनी बारच्या संरक्षकांवरही गोळ्या झाडल्या. तसेच मावेला म्हणाले की, "प्राथमिक तपासणीत असे दिसून आले आहे की, तेथे उपस्थित असलेले लोक परवाना असलेल्या बारमध्ये सेलिब्रेशन करत होते.

हेही वाचा - Video : श्रीलंका धगधगतंय! नागरिकांनी पंतप्रधानांच्या घरात घुसून लावली आग, गाड्यांचाही चुराडा

पुढे ते म्हणाले की, 'अचानक या लोकांनी बंदुकीचा आवाज ऐकला आणि बारमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. या घटनेमागचा हेतू काय आणि या लोकांना का लक्ष्य करण्यात आले. याबाबत सध्या आमच्याकडे संपूर्ण माहिती नाही.'' मात्र, 'या हल्ल्यात 'हाय कॅलिबर' बंदुका वापरण्यात आल्या असून त्या अंदाधुंद गोळीबार करत असल्याचे दिसत आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

First published:
top videos

    Tags: Crime news, Death, South africa