• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • Pregnant महिलेला नोकरीवरुन काढलं; आता द्यावं लागेल 66 लाखांचं Compensation

Pregnant महिलेला नोकरीवरुन काढलं; आता द्यावं लागेल 66 लाखांचं Compensation

मात्र या प्रकरणात महिलेला मोठा धक्का सहन करावा लागला

 • Share this:
  लंडन, 23 जुलै : गर्भवती महिलेने (Pregnant Woman) गर्भवती असताना दोन आठवड्यांची सुट्टी घेतली होती. त्यानंतर कंपनीने तिला नोकरीवरुन काढून टाकलं. या धक्क्यामुळे महिलेचा गर्भपात झाला. आता एका लेबर ट्रब्युनलने कंपनीला दोषी मानत महिलेला 65 हजार पाऊंड म्हणजे 66 लाख 57 हजार रुपयांची नुकसानभरपाई (Compensation) देण्याचे आदेश दिले आहेत. द सनमधील एका बातमीनुसार, Maya Geogiev ने जुलै 2018 मध्ये मँनचेस्टर मधील Personal Insolvency Company मध्ये काम सुरू केलं होतं. त्यावर्षी 29 ऑगस्ट रोजी तिला मॉर्निंग सिकनेसच्या कारणास्तप ती गर्भवती असल्याचं कळालं. यानंतर तिने ऑफिसला न जाता वर्क फ्रॉम होम सुरू केलं होतं. कंपनीने महिलेला नोकरीवरुन काढलं Maya Geogiev ला जेव्हा ती गर्भवती असल्याचं कळालं, त्यादरम्यान ती कंपनीत प्रोबेशन पीरियडवर होती. तिने आपल्या सहकाऱ्यांना याबाबत माहिती दिली आणि सांगितलं की, याबद्दल कोणालाही सांगू नका. Geogiev ने सांगितलं की, तिला भीती होती की कंपनी तिला नोकरीवरुन काढून टाकू शकते. त्यानंतर महिलेने एचआरची प्रमुख सुजैन ग्रीव्सला आपल्या स्थितीबाबत माहिती दिली. आपल्या प्रोबेशन पीरियडच्या शेवटच्या दिवशी 8 ऑक्टोबर रोजी Maya Geogiev कामावर परतली. त्या दरम्यान कंपनीचे कन्सल्टिंग मॅनेजिंग डायरेक्टर डॅनियल मॉरिसने तिला मीटिंगसाठी बोलावलं. त्यावेळी मॉरिसने कामावर न येण्याचं कारण विचारलं. त्यावेळी मायाने ती गर्भवती असल्याचं सांगितलं. आजारी कर्मचाऱ्यांना सांभाळू शकत नसल्याचं कारण देत कंपनीने तिला नोकरीवरुन काढून टाकलं. धक्क्यामुळे दुसऱ्यांदा झाला गर्भपात Maya Geogiev ने कंपनीला पत्र लिहून निलंबन मागे घेण्याची विनंती केली. या पत्रात मायाने लिहिलं आहे की, प्रोबेशन पीरियडमध्ये तिच्या परफॉमन्सवर कोणीच बोललं नाही. केवळ गर्भवती असल्यामुळे तिला कामावरुन काढून टाकण्यात आलं. त्यानंतर माया तणावात होती व त्यातच तिचा दुसऱ्यांदा गर्भपात झाला. हे ही वाचा-डॉक्टर करत होते मेंदूचं ऑपरेशन आणि रुग्ण म्हणत होता हनुमान चालिसा त्यानंतर मायाने धाडस करीत यूके डेबिट सर्व्हिसेससोबत नवीन नोकरी सुरू केली. तसेच तिच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात कामगार न्यायाधिकरणात गुन्हा दाखल केला. न्यायमूर्ती हिलरी स्लेटर यांच्या अध्यक्षतेखालील न्यायाधिकरणाने या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी घेत या प्रकरणातील हॅनोव्हर इन्सॉल्व्हेंसीविरूद्ध आदेश जारी केला आहे. ट्रिब्यूनलने म्हटले आहे की, कंपनीला माया गोगीएव यांना 65 हजार पौंड म्हणजेच 65 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागेल.

  Published by:Meenal Gangurde
  First published: