• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • VIDEO: डॉक्टर करत होते मेंदूचं operation आणि रुग्ण म्हणत होती hanuman chalisa; AIIMS च्या डॉक्टरांचा नवा प्रयोग यशस्वी

VIDEO: डॉक्टर करत होते मेंदूचं operation आणि रुग्ण म्हणत होती hanuman chalisa; AIIMS च्या डॉक्टरांचा नवा प्रयोग यशस्वी

दिल्लीतील डॉक्टरांच्या टीमनं एका 24 वर्षांच्या मुलीला (24 year old girl brain surgery) पूर्ण बेशुद्ध न करताच तिच्या मेंदूचं ऑपरेशन केलं आणि ते यशस्वी झालं.

 • Share this:
  नवी दिल्ली, 23 जुलै: दिल्लीतील (Delhi) एम्स रुग्णालयाच्या (AIMS Hospital) भूल देणाऱ्या पथकाच्या नावे नवा विक्रम नोंदवला गेला आहे. दिल्लीतील डॉक्टरांच्या टीमनं एका 24 वर्षांच्या मुलीला (24 year old girl) पूर्ण बेशुद्ध न करताच तिच्या मेंदूचं ऑपरेशन केलं आणि ते यशस्वी झालं. एम्स रुग्णालयातील डॉक्टर ऑपरेशन (operation) करत होते आणि तरुणी स्वतःवर ऑपरेशन होत असताना हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) वाचत होती. या घटनेचे काही व्हिडिओदेखील बाहेर आल्यामुळे विज्ञानाच्या या नव्या अविष्काराचं सगळेच कौतुक करत आहेत. ऑपरेशन आणि हनुमान चालिसा एखाद्या रुग्णाचं ऑपरेशन यशस्वी होणार की नाही, हा सर्वस्वी विज्ञानाचा आणि डॉक्टरांच्या कौशल्याचा भाग असला, तरी सर्वसामान्य जनतेला मात्र परमेश्वराचा धावा केल्यावर मोठा मानसिक आधार मिळत असतो. ज्या रुग्णाचं ऑपरेशन होत असतं, त्याचे आईवडिल किंवा इतर नातेवाईक हनुमान चालिसा किवा इतर मंत्र, पोथ्या वगैरेंचं वाचन करत असतात. पण या घटनेत जिच्यावर ऑपरेशन सुरू आहे, ती तरुणी स्वतःच हनुमान चालिसा वाचत होती. डॉक्टरांना झाला हा फायदा मेंदूचं ऑपरेशन होत असताना रुग्ण हनुमान चालिसा वाचत असल्याचा मोठा फायदा झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. मेंदुतील आवाजावर नियंत्रण ठेवणारा भाग त्यामुळे संतुलित राहतो आणि रुग्ण एका सलग आवाजात बोलत राहिल्याने हा भाग जागृत राहतो, असं डॉक्टरांनी म्हटलं आहे. काही तासांच्या या शस्त्रक्रियेत डॉक्टरांनी मेंदूतील गाठ यशस्वीपणे बाहेर काढण्यात यश मिळवलं. डॉक्टरांच्या या टीमचं सर्वत्र कौतुक होत आहे. हे वाचा -Gold Price Today: आज सलग सहाव्या दिवशी सोने दरात घसरण, पाहा काय आहे गोल्ड रेट राजस्थानच्या बिकानेरमध्येदेखील एका रुग्णाला पूर्ण भूल न देता ऑपरेशन करण्यात आलं होतं. हा रुग्णदेखील त्यावेळी हनुमान चालिसा वाचत असल्याची घटना घडली होती. हे ऑपरेशनदेखील यशस्वीरित्या पार पडलं होतं. मेंदूचं ऑपरेशन हे सर्वात जटिल ऑपरेशन मानलं जातं. ही ऑपरेशन्स आता पूर्ण भूल न देता होऊ लागणं, हा विज्ञान क्षेत्रातील एक नवा चमत्कार आहे.
  Published by:desk news
  First published: