जकार्ता, 20 ऑक्टोबर : गेल्या काही दिवसांत इमारती, वाहनांना आग लागून नुकसान होण्याच्या घटना वाढल्या आहेत. बुधवारी इंडोनेशिया, पाकिस्तान आणि न्यूयॉर्कमध्ये आगीच्या घटनांची नोंद झाली. इंडोनेशियात जाकार्ता येथे 19 ऑक्टोबरला आगीची मोठी दुर्घटना घडली. जकार्तामधल्या इस्लामिक सेंटर ग्रँड मशिदीच्या विशाल घुमटाला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमुळे महाकाय घुमट क्षणार्धात कोसळला. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असं `गल्फ टुडे`नं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ही आग अत्यंत वेगानं पसरली. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागला. इंडोनेशियातल्या जाकार्तामधल्या इस्लामिक सेंटर ग्रँड मशिदीच्या महाकाय घुमटाला 19 ऑक्टोबरला अचानक आग लागली. हा संपूर्ण घुमट आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, `घुमटाच्या नूतनीकरणाचं काम सुरू होतं. त्या वेळी अचानक आग लागली. या घटनेची माहिती तत्काळ अग्निशमन विभागाला कळवण्यात आली. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.` मशिदीच्या घुमटाला आग लागल्यानंतर ती वेगानं पसरू लागली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी मशिदीच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना दिल्या. आग वेगानं पसरत असल्यानं ती नियंत्रणात आणताना अग्निशमन दलाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
BREAKING: The dome of the Jakarta Islamic Centre Grand Mosque in Koja, Indonesia has collapsed after being engulfed in flames during renovations.
— Benny Johnson (@bennyjohnson) October 19, 2022
The cause of the incident is under investigation. pic.twitter.com/rsLxxAGPlv
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मशीद कोसळण्याआधी घुमटातून ज्वाळा आणि धूर निघताना आणि नंतर ती कोसळताना व्हिडिओ फुटेजमध्ये दिसत आहे. `आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आम्ही आगीच्या कारणाचा तपास करत आहोत. मशिदीचं नूतनीकरण करत असलेल्या कॉन्ट्रॅक्टर कंपनीच्या चार मजुरांची चौकशी केली जाणार आहे,` अशी माहिती घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी दिली. `एएनआय` या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, सुमारे 20 वर्षांपूर्वी म्हणजेच 2002 मध्ये ऑक्टोबर महिन्यातच या मशिदीला आग लागली होती. त्या वेळीदेखील मशिदीच्या नूतनीकरणाचं काम सुरू होतं. त्या वेळी आग नियंत्रणात आणण्यासाठी पाच तास लागले होते.
America Firing : मेक्सिकोच्या सिटी हॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार, महापौरांसह 18 जण ठारदरम्यान, पाकिस्तानच्या जमशोरो जिल्ह्यात बुधवारी एका प्रवासी बसला आग लागली. या दुर्घटनेत आठ मुलांसहित 18 जण जिवंत जळाले. तसंच अनेक प्रवासी जखमी झाले. जखमींना जमशोरो रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. न्यूयॉर्कमधल्या एका बांगलादेशी रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी गेलेल्या एका इसमानं रेस्टॉरंटला आग लावली. रेस्टॉरंटमधले पदार्थ आवडले नाहीत म्हणून त्यानं हे कृत्य केलं. पोलिसांनी त्या इसमाला अटक केली आहे.