मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्यानं कोविड रुग्णालयाला भीषण आग, 15 जणांचा होरपळून मृत्यू

ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्यानं कोविड रुग्णालयाला भीषण आग, 15 जणांचा होरपळून मृत्यू

भारतातील विरार येथील कोविड रुग्णालयाला आग लागल्याची घटना ताजी असताना, आता बगदाद येथील एका कोविड रुग्णालयाला भीषण आग (fire at Covid hospital in Baghdad) लागल्याची माहिती समोर आली आहे.

  • Published by:  News18 Desk

बगदाद, 25 एप्रिल: जगभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. भारतासह अमेरिका, ब्रिटन, इराक आणि इतर आखाती राष्ट्रांभोवतीही कोरोना विषाणूचा विळखा घट्ट होताना दिसत आहे. दुसरीकडे कोविड रुग्णालयात अपघात होण्याचं प्रमाणही वाढत आहे. भारतातील विरार येथील कोविड रुग्णालयाला आग लागल्याची घटना ताजी असताना, आता बगदाद येथील एका कोविड रुग्णालयाला भीषण आग (fire at Covid hospital in Baghdad) लागल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी लागलेल्या या आगीत किमान 15 जणांचा होरपळून मृत्यू (15 patients death in fire) झाल्याची माहिती समोर आली आहे.

शनिवारी रात्री उशीरा रुग्णालयातील ऑक्सिजनच्या टाकीचा स्फोट (oxygen cylinder blast) झाल्यानं ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितलं की, रात्री उशीरा आग लागल्याने आग विझवण्यासाठी अनेक अडचणी आल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आणि रुग्णांना इब्न-अल-खातिब रुग्णालयातून बाहेर काढलं. दरम्यान या रुग्णालयाच्या आयसीयूमध्येही काही गंभीर रुग्ण उपचार घेत होते.

घटनास्थळी हजर असलेल्या डॉ. सबा अल कुजै यांनी सांगितलं की, "या दुर्घटनेत नेमके किती लोक मरण पावले याची माहिती अद्याप समोर आली नाही. पण इस्पितळात बर्‍याच ठिकाणी जळलेल्या अवस्थेत अनेक मृतदेह सापडले आहेत." वैद्यकीय आणि सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांच्या मते, या दुर्घटनेत किमान 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 36 लोकं गंभीर जखमी झाले आहेत. इराकी अधिकाऱ्यांनी मृतांची अधिकृत आकडेवारी अद्याप जाहीर केली नाही.

हे ही वाचा- Virar Hospital Fire: 'माझी बरी होत आलेली आई गेली हो...', मुलीची मन हेलावून टाकणारी प्रतिक्रिया; VIDEO

रुग्णालयाच्या एका डॉक्टरांनी सांगितलं की, आगीच्या वेळी रुग्णालयात किमान 120 रुग्ण उपचार घेत होते. रुग्णालयातील एका ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाल्यानं ही आग लागल्याची माहितीही संबंधित डॉक्टरांनी दिली आहे. सध्या इराकमध्ये दररोज आठ हजाराहून अधिक नवीन रुग्ण सापडत आहेत. असं असलं तरी इराकी नागरिक लस घेण्यासाठी कुचराई करत आहेत. देशाच्या आरोग्य यंत्रणेवर आणि लशींवर विश्वास नसल्यानं हे नागरीक लस घेण्यास घाबरत आहेत.

First published:

Tags: Corona, Hospital Fire