Home /News /videsh /

पित्यानं 6 वर्षाच्या चिमुकलीला मारून 3 हजार फुट खाली लपवला मृतदेह, असा झाला खुलासा

पित्यानं 6 वर्षाच्या चिमुकलीला मारून 3 हजार फुट खाली लपवला मृतदेह, असा झाला खुलासा

एका पित्यानं आपल्या 6 वर्षाच्या चिमुकलीची हत्या (Father killed 6 years old daughter) करून तिचा मृतदेह जमिनीपासून तब्बल 3000 फुट खाली (hide dead body 3000 feet below) लपवला होता. दीड महिन्यानंतर याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.

    माद्रिद, 12 जून: एका पित्यानं आपल्या 6 वर्षाच्या चिमुकलीची हत्या (Father killed 6 years old daughter) करून तिचा मृतदेह जमिनीपासून तब्बल 3000 फुट खाली (hide dead body 3000 feet below) लपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तब्बल दीड महिन्यांनी तिचा मृतदेह समुद्राच्या तळाशी सापडला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आरोपी वडिलांनी काही दिवसांपूर्वी आपल्या दोन अल्पवयीन मुलीचं अपहरण केलं होतं. त्यातील मोठ्या मुलीचा मृतदेह सापडला आहे. पण अद्याप धाकट्या मुलीचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित घटना स्पेन देशातील टेनेरिफ येथील असून आरोपी वडिलांचं नाव टोमस जिमेनो असं आहे. आरोपी वडिलांनी दीड महिन्यापूर्वी आपल्या एक्स बायकोच्या घरातून आपल्या दोन मुलींचं अपहरण केलं होतं. शुक्रवारी 3000 फुट खाली समुद्रात 6 वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. दुसऱ्या मुलीचा अद्याप काहीही थांगपत्ता लागला नसून आरोपी वडिलांनी दुसऱ्या मुलीचीही हत्या केल्याचा संशय पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. पोलिसांनी दुसऱ्या मुलीचा शोध सुरू केला आहे. रोबोटने शोधून काढला मृतदेह द सनने दिलेल्या वृत्तानुसार, वडिलांनी सहा वर्षीय चिमुकलीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह एका स्पोर्ट बॅगमध्ये भरला होता. यानंतर आरोपीने अँकरच्या मदतीने मृतदेहाची ही बॅग 3000 फुट खाली समुद्रात बांधून ठेवली होती. ज्यामुळे घटनेच्या दीड महिन्यानंतरही मृतदेह तरंगत वर आला नाही. दरम्यान एका रोबोटने हा मृतदेह शोधून काढला आहे. हा रोबोट समुद्राच्या तळाला एका बुडलेल्या जहाजाचे अवशेष शोधत होता. हे ही वाचा-पतीची हत्या करत महिलेचं विकृत कृत्य, गुप्तांग कापून तेलात तळलं आणि मग... मृत मुलीच्या आईनं दीड महिन्यांपूर्वी दोन्ही मुली बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदली होती. 27 एप्रिलपासून दोन्ही मुली बेपत्ता होत्या. पीडित महिलेचा जुना पार्टनरही त्या दिवसांपासून बेपत्ता होता. आता सहा वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर आता पोलीस एक वर्षाच्या एन्नाचा शोध घेत आहेत. तिच्या हत्येबाबत कोणताही पुरावा अद्याप पोलिसांना मिळाला नाही. नराधम बापावर कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी अनेकांकडून केली जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Murder Mystery, Spain

    पुढील बातम्या