साना, 6 जून : निसर्गानं (Nature) काही खास अशा गोष्टींची निर्मिती केली आहे. या गोष्टी पाहताच क्षणभर डोळ्यांवरही विश्वास बसत नाही. सोशल मीडियावर (Social Media) अशा गोष्टींचे फोटो दिसले तर प्रथमदर्शनी ते खोटे ठरवण्याची चूक आपल्याकडून होऊ शकते. येमेनमध्ये (Yemen) असंच एक झाड (Tree) आढळून आलं आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे, हे झाड तोडल्यास त्यातून मानवी रक्तासारखा घट्ट आणि लाल रंगाचा द्रव (Red Liquid) बाहेर येतो. हे झाड तोडल्यावर जणू ते रक्ताचे अश्रू ढाळत आहे, असं भासून तुम्ही क्षणभर घाबरून जाल; पण हा द्रव पदार्थ अत्यंत उपयुक्त असल्याचं लोक सांगतात. फेक विरुद्ध रिअल (Fake Vs. Real) या सीरिज अंतर्गत आज आम्ही तुम्हाला वैशिष्ट्यपूर्ण आणि निसर्गाचा चमत्कार असलेल्या या झाडाविषयी सांगणार आहोत. सर्वसाधारणपणे, झाड तोडल्यानंतर त्यातून पारदर्शक किंवा पांढऱ्या रंगाचा चिकट पदार्थ बाहेर पडतो ज्याला आपण चिक म्हणतो; पण हे झाड कापल्यावर त्यातून लाल रक्तासारखा द्रव पदार्थ बाहेर पडतो. हे झाड सर्वसामान्य झाडांप्रमाणे नाही. ते काहीसं उलट पद्धतीने वाढतं. ड्रॅगन ब्लड ट्रीमधून येतं रक्त ड्रॅगन ब्लड ट्री (Dragon Blood Tree) असं या अनोख्या झाडाचं नाव असून, हा निसर्गाचा अद्भुत चमत्कार आहे. सकोटा बेटांवर आढळणाऱ्या या झाडाला अन्य वनस्पतींइतकी पाण्याची गरज नसते. उष्ण तापमानात हे झाड अतिशय आरामात वाढतं. या झाडाची लांबी 33 ते 39 फुटांपर्यंत असते. तसंच त्याचं आयुर्मान 650 वर्षापर्यंत असू शकतं. हे झाड खालून पूर्णपणे सपाट असतं आणि त्याच्या फांद्या वरपर्यंत वाढताना जाड होत जातात. त्याची पानं खूप दाट असतात आणि त्यांचा विस्तार एखाद्या छत्रीप्रमाणे दिसतो. यातून बाहेर पडणारी लाल रंगाची राळ (Resin) हे या झाडाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य होय. या झाडाची साल कापल्यानंतर त्यातून रक्तासारखा लाल रंगाचा पदार्थ बाहेर पडतो. त्यामुळे त्याला ब्लड ट्री असं म्हटलं जातं.
जादुई झाड असल्याची लोकांची भावना येमेनमध्ये या झाडाबद्दल वेगवेगळ्या समजुती आहेत. या झाडातून निघणारी रक्तासारखी राळ ही अत्यंत गुणकारी समजली जाते. तापापासून ते अल्सरपर्यंत विविध आजारांवर ही गुणकारी ठरत असल्याचा दावा येथील लोक करतात. या झाडाला मुकवा, मुनिंगा आणि ब्लडवूड ट्री असंही म्हटलं जातं. त्याच्या वैद्यकीय गुणधर्मांमुळे लोक या झाडाला जादुई वृक्ष (The magic tree) मानतात. त्याचा रंग वस्तू रंगवण्यासाठी वापरला जातो. या लिक्विडचा रंग अतिशय टिकाऊ असतो, असं येथील लोक सांगतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.