Home /News /videsh /

मृत व्यक्तींच्या राखेपासून आणि केसांपासून हिरे बनवते ही कंपनी; आप्तांच्या आठवणी ठेवते ताज्या

मृत व्यक्तींच्या राखेपासून आणि केसांपासून हिरे बनवते ही कंपनी; आप्तांच्या आठवणी ठेवते ताज्या

2020मध्ये या कंपनीच्या नफ्यात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे.

    आपल्या जवळची व्यक्ती गेल्याचं दुःख कोणत्याही मार्गाने भरून येत नाही; मात्र त्या व्यक्तीच्या मौल्यवान आठवणी आणि त्या आठवणींशी निगडित वस्तू हे दुःख काही प्रमाणात हलकं करू शकतात. ती व्यक्ती त्या रूपाने आपल्या जवळ असल्याचा आभास निर्माण करू शकतात. याच कल्पनेतून ऑस्टिनमधल्या एका स्टार्टअप कंपनीने आपल्या दिवंगत आप्तस्वकीयांच्या आठवणी जपण्याची एक कल्पना मांडली आहे. इटर्नाव्हा (Eternava) असं या कंपनीचं नाव असून, मृत व्यक्ती (Dead human or Pet) किंवा पाळीव प्राण्याच्या अंत्यसंस्कारानंतरची राख (Ashes or hair) किंवा त्यांचे केस यांपासून हिऱ्यांची निर्मिती (Diamond) करण्याचं काम ही कंपनी करते. ही कल्पना थोडी विचित्र वाटली, तरी लोकांना ती आवडत आहे. कारण 2017 मध्ये सुरू झालेल्या या कंपनीच्या व्यवसायात मोठी वाढ झाली आहे, असं वृत्त टेक-क्रंचने दिलं आहे. 2020मध्ये या कंपनीच्या नफ्यात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. टायगर मॅनेजमेंट ही कंपनी इटर्नाव्हामधली मुख्य गुंतवणूकदार असून, कॅप्स्टार व्हेंचर्स, गुडवॉटर कॅपिटल, नेक्स्ट कोस्ट व्हेंचर्स आदी कंपन्यांसह अब्जाधीश मार्क क्युबन आदींनीही इटर्नाव्हामध्ये गुंतवणूक केली आहे. आता या कंपनीत 10 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक नव्याने झाली आहे. आडेला आर्चर (Adella Archer) यांनी गॅरेट ओझर (Garret Ozar) यांच्यासह 2017मध्ये इटर्नाव्हा कंपनीची स्थापना केली. आडेला आर्चर या सध्या कंपनीचे सीईओ आहेत. आर्चर यांची जवळची मैत्रीण ट्रेसी कौफमन (Tracey Kaufman) यांचा वयाच्या 47व्या वर्षी पँक्रिअॅटिक कॅन्सरमुळे मृत्यू झाला. ट्रेसी यांच्या पश्चात कोणीही वारस नसल्याने त्यांनी त्यांच्या अंत्यसंस्कारानंतर अस्थींची रक्षा त्यांची काकू आणि जिवलग मैत्रीण आर्चर यांच्याकडे ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती दररोज कमवा 4 ते 5 हजार रुपये; हा व्यवसाय करून एका महिन्यात व्हा लखपती ट्रेसी या आर्चर यांच्या मेंटॉरही होत्या. ट्रेसी यांच्या अस्थींची रक्षा आणि त्यांच्या आठवणी योग्य पद्धतीने जतन करून ठेवण्यासाठी आर्चर काही पर्याय शोधत होत्या. त्या वेळी आर्चर लॅब ग्रोन डायमंड (Lab Grown Diamond) अर्थात प्रयोगशाळेत हिरेनिर्मितीच्या स्टार्टअपवर काम करत होती. त्या वेळी हिरे या विषयातल्या एका शास्त्रज्ञासोबत आर्चर ट्रेसीच्या मृत्यूबद्दल बोलत होत्या. त्या शास्त्रज्ञाने आर्चर यांना सुचवलं, की अस्थींच्या रक्षेतल्या कार्बनचा वापर करून हिऱ्यांची निर्मिती करणं शक्य आहे. ही कल्पना आर्चर यांना प्रचंड आवडली. त्यामुळे त्यांनी ट्रेसी यांच्या अस्थींच्या रक्षेपासून हिरा तयार करण्याचं काम हाती घेतलं. अशा रीतीने त्यांची कंपनी सुरू झाली. ही कंपनी सुरू झाल्यापासून गेल्या चार वर्षांत इटर्नाव्हा कंपनीने 1000हून अधिक ग्राहकांसाठी 1500 हिरे तयार केले आहेत. या कंपनीतर्फे तयार केल्या जाणाऱ्या हिऱ्यांच्या किमती कमीत कमी 2999 डॉलर्सपासून सुरू होतात. हिऱ्यांच्या आकारानुसार त्यांच्या किमती बदलतात. आपल्या आयुष्यातल्या हिऱ्यासारख्या माणसांच्या आठवणी हिऱ्याच्या रूपाने साठवण्याची ही कल्पना लोकांना भावली असून, या आगळ्यावेगळ्या कंपनीला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कंपनीच्या ग्राहकांपैकी 40 टक्के ग्राहकांनी त्यांच्या पाळीव प्राण्यांच्या अस्थींची रक्षा किंवा केसांपासून हिरे तयार करून घेतले आहेत, ही आणखी एक नोंदवण्यासारखी गोष्ट आहे.
    First published:

    Tags: Diamond

    पुढील बातम्या