• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • दररोज कमवा 4 ते 5 हजार रुपये; हा व्यवसाय करून एका महिन्यात व्हा लखपती

दररोज कमवा 4 ते 5 हजार रुपये; हा व्यवसाय करून एका महिन्यात व्हा लखपती

हा व्यवसाय आहे कॉर्न फ्लेक्सच्या निर्मितीचा. हा व्यवसाय योग्य पद्धतीने केल्यास महिन्याभरात लखपती होता येऊ शकतं.

 • Share this:
  मुंबई 27 जुलै: तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करू इच्छित आहात का? आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यवसायाची (Business) माहिती सांगणार आहोत, की ज्यातून तुम्ही दिवसाला चार हजार रुपयांपर्यंत म्हणजेच महिन्याला सुमारे एक लाख 20 हजार रुपयांपर्यंतचा नफा (Profit) कमावू शकता. हा व्यवसाय आहे कॉर्न फ्लेक्सच्या निर्मितीचा. हा व्यवसाय योग्य पद्धतीने केल्यास महिन्याभरात लखपती होता येऊ शकतं. मक्याबद्दल (Corn) आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मक्याची कणसं भाजून किंवा शिजवून खाल्ली जातात. तसंच, मक्याच्या दाण्यांचा वापरही विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांमध्ये केला जातो. त्याशिवाय कॉर्न फ्लेक्सचाही आहारात समावेश केला जातो. प्रामुख्याने नाश्त्याच्या (Breakfast Food) वेळी कॉर्न फ्लेक्स खाल्ले जातात. हे कॉर्न फ्लेक्स बनविण्याचा व्यवसाय कसा सुरू करायचा, हे पाहू या. Gold Price Today: सोन्यामध्ये 123 तर चांदीमध्ये 206 रुपयांची घसरण, काय आहे आजचा सोन्याचा भाव हा व्यवसाय उभारायचा असेल, तर तुमच्याकडे जमीन (Land) असणं आवश्यक आहे. कारण त्यासाठी प्लांट (Plant) उभारावा लागतो. तसंच स्टॉक साठवण्यासाठी गोदामही उभारावं लागतं. त्याशिवाय मक्याची शेती तुम्हीच करणार असाल तर आणखी जमीन लागते. मक्याची शेती तुम्हीच करणार असाल, तर कच्च्या मालासाठी (Raw Material) पुरवठादारावर अवलंबून राहण्याची गरज नाही. तसंच, त्यासाठीच्या खर्चातही कपात होईल. प्लांटसाठी आणि गोदमासाठी किमान दोन हजार ते तीन हजार स्क्वेअर फूट एवढी जागा असणं आवश्यक आहे. या व्यवसायासाठी मशिनरी, वीजपुरवठा, जीएसटी नंबर, कच्चा माल आदींची गरज भासते. Personal Loan घेण्याचा विचार करताय? त्यापूर्वी Cibil Score सह लक्षात घ्या या गोष्टी; ठरेल फायद्याचे कॉर्न फ्लेक्स बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मशीनमधून केवळ मक्याचेच नव्हे, तर गहू (Wheat) आणि तांदळाचे (Rice) फ्लेक्सही बनवता येतात. मक्याची शेती (Corn Farming) मोठ्या प्रमाणावर होत असेल, अशा भागांत हा व्यवसाय उभारणं श्रेयस्कर. कारण उत्पादक क्षेत्रापासून प्लांट दूरच्या अंतरावर असला, तर वाहतूक खर्चात वाढ होते. त्यामुळे मक्यासाठी अनुकूल हवामान, जमीन असेल अशा ठिकाणी हा व्यवसाय सुरू केला, तर आपल्याला स्वतःदेखील मक्याची शेती करणं शक्य होऊ शकेल. एक किलो कॉर्न फ्लेक्स (Corn Flakes) बनवण्यासाठी सुमारे 30 रुपये खर्च येतो. बाजारात सुमारे 70 रुपये प्रति किलो या दराने त्याची विक्री होऊ शकते. 100 किलो कॉर्न फ्लेक्सची विक्री एका दिवसात झाली, तर 4000 रुपये नफा एका दिवसात कमावता येऊ शकेल. या हिशेबाने महिन्याची कमाई एक लाख 20 हजार रुपये एवढी होईल. हा व्यवसाय तुम्ही किती प्रमाणावर सुरू करणार आहात, त्यावर त्यातली गुंतवणूक अवलंबून असते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी पाच ते आठ लाख रुपयांची गुंतवणूक करणं गरजेचं असतं. त्यामुळे आपल्या क्षमतेनुसार आपण मोठ्या प्रमाणावर व्यवसाय सुरू करायचा की छोट्या प्रमाणावर, हे ठरवता येऊ शकतं.
  First published: