Russia Ukraine War: एलोन मस्क यांचं पुतिन यांना खुलं चॅलेंज, दोन हात करा नाही तर...
Russia Ukraine War: एलोन मस्क यांचं पुतिन यांना खुलं चॅलेंज, दोन हात करा नाही तर...
Elon Musk
रशिया युक्रेन युद्धादरम्यान (Russia Ukraine War) इलेक्ट्रिक कार निर्मिती करणाऱ्या टेस्ला कंपनीचा मालक आणि अब्जाधीश असलेल्या इलॉन मस्क (Elon Musk) सध्या चर्चेत आले आहे. रशियन अध्यक्ष हे भित्रे असून त्यांनी आपल्यासोबत येऊन दोन हात करा असे खुलं चॅलेंज पुतिन (Vladimir Putin) यांना दिले आहे.
नवी दिल्ली, 16 मार्च: रशिया युक्रेन युद्धादरम्यान (Russia Ukraine War) इलेक्ट्रिक कार निर्मिती करणाऱ्या टेस्ला कंपनीचा मालक आणि अब्जाधीश असलेल्या इलॉन मस्क (Elon Musk) सध्या चर्चेत आले आहे. रशियन अध्यक्ष हे भित्रे असून त्यांनी आपल्यासोबत येऊन दोन हात करा असे खुलं चॅलेंज पुतिन (Vladimir Putin) यांना दिले आहे. त्यानंतर, रशियाच्या स्पेस प्रोग्रामच्या महासंचालकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आणि एलोन मस्क यांना कमी लेखले. यावर इलॉन मस्कला राग आला आणि त्याने रशियन अधिकाऱ्याला मूर्ख म्हटले. ट्विटरवरील या दोघांमधील वाद सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
अनेक देशांनी युक्रेनला समर्थन देत रशियाला एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला आहे. तर काही देशांनी तटस्थ भूमिका घेतली आहे. दरम्यान, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योगपती एलोन मस्क यांचं एक ट्वीट चर्चेत आलं आहे.
एलोन मस्क यांनी पुतिन यांना "मी पुतिन यांना सरळ समोरा-समोरच्या लढाईचं आव्हान देतोय. यामध्ये युक्रेन दाव लागलेला असेल." पुतिन तुम्ही या लढाईसाठी तयार आहे का? असा सवालही त्याने केला आहे. महत्त्वाचं म्हणजे या ट्वीटमध्ये त्याने रशियाच्या राष्ट्रपती भवनच्या म्हणजे क्रेमलिनच्या ट्विटर हॅन्डलला टॅग केलं आहे.
विशेष म्हणजे हे ट्विट रशियन भाषेत तर युक्रेनचे नाव युक्रेनियन भाषेत लिहिले आहे. चेचन्याचे पंतप्रधान रमझान कादिरोव हे व्लादिमीर पुतिन यांच्या जवळचे मानले जातात. ते पुतीन यांचेही कट्टर समर्थक आहेत.
पुतीनचा बचाव करण्यासाठी कादिरोव्ह टेस्ला सीईओला उत्तर देतात. कादिरोव्हने गमतीने एलोन मस्कला अलिओना म्हटले.कादिरोव्ह यांच्या या उत्तरानंतर मस्कने आपल्या ट्विटर अकाऊंटच्या नावात बदल केला.
युद्धाच्या ठिकाणी युक्रेनला एलोन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सकडून स्टारलिंक उपग्रह इंटरनेट टर्मिनल्स मिळाले आहेत. एलोन मस्क उघडपणे युक्रेनच्या बाजूने उभे राहण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही मस्क यांनी, भीषण युद्ध सुरू असतानाच आपल्या कंपनीच्या स्टरलिंक सॅटेलाइटच्या माध्यमाने युक्रेनला इंटरनेट कनेक्टिव्हिटी देऊन मदत केली होती.
Published by:Dhanshri Otari
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.