Home /News /videsh /

इम्रान खान यांचा दावा ठरला फोल! पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांना सापडला नाही 'तो' पुरावा

इम्रान खान यांचा दावा ठरला फोल! पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांना सापडला नाही 'तो' पुरावा

imran khan

imran khan

Pakistan Imran Khan News: 30 मार्च रोजी, पाकिस्तानमध्ये अडचणीचा सामना करणारे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्या पत्राचे काही तपशील वरिष्ठ पत्रकार आणि कॅबिनेट सहकाऱ्यांसोबत शेअर केले, ज्याला त्यांनी 'परकीय षड्यंत्र पत्र' म्हटले.

    इस्लामाबाद, 5 एप्रिल : आपलं सरकार पाडण्यासाठी बाह्यशक्तीचा हात असल्याचा दावा पंतप्रधान इम्रान खान यांनी केला होता. मात्र, पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या तपासात असा कोणताही ठोस पुरावा सापडला नाही. परिणामी इम्रान खान यांचा दावा खोटा असल्याचे समोर आलं आहे. परिस्थितीची माहिती असलेल्या एका सुत्राने मंगळवारी रॉयटर्सला सांगितले, की पंतप्रधान इम्रान खान आणि नॅशनल असेंब्लीचे डेप्युटी स्पीकर यांनी म्हटले होते की, राष्ट्रीय सुरक्षा समिती, नागरी अधिकारी, लष्करी आणि गुप्तचर प्रमुखांचा समावेश असलेल्या उच्च मंडळाने सरकारविरुद्धच्या षडयंत्राची पुष्टी केली होती. अशा प्रकरणांचा पर्दाफाश करणार्‍या अधिकाऱ्याने सांगितले की सुरक्षा एजन्सी इम्रान खान यांनी केलेल्या दाव्यापर्यंत पोहचली नाही. याची माहिती त्यांना देण्यात आली होती. गेल्या आठवड्यात इम्रान खान यांनी त्यांचे संसदीय बहुमत गमावले. संयुक्त विरोधी पक्षाकडून त्यांना अविश्वास ठरावाचा सामना करावा लागणार होता, जो रविवारी गमावण्याचा अंदाज होता. मै झुकेगा नही! इम्रान खान यांचा जीव टांगणीला लावणारे पाकिस्तानचे सरन्यायाधीश आहेत तरी कोण? सत्तेवरून हटवण्यासाठी 'परकीय षडयंत्र' : इम्रान खान संसदेच्या उपसभापतींनी त्याला “परकीय षड्यंत्र” आणि “असंवैधानिक” म्हणत हा प्रस्ताव फेटाळून लावला. त्यानंतर पंतप्रधान इम्रान यांच्या सूचनेनुसार राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी संसद बरखास्त केली. खरं तर, इम्रान यांनी 27 मार्च रोजी एका सार्वजनिक सभेत एक कथित पत्र जाहीर करत त्यांना सत्तेतून हटवण्यासाठी परकीय षड्यंत्र रचले गेल्याचा दावा केला होता. पंतप्रधान इम्रान यांनी त्यांच्याविरुद्ध विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावाचा संदर्भ देत म्हटले की, हे त्यांचे सरकार पाडण्यासाठी परकीय अनुदानीत चालीचे उदाहरण आहे. 30 मार्च रोजी पाकिस्तानमध्ये अडचणीचा सामना करणारे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्या पत्राचे काही तपशील वरिष्ठ पत्रकार आणि कॅबिनेट सहकाऱ्यांसोबत शेअर केले, ज्याला त्यांनी 'परकीय षड्यंत्र पत्र' म्हटले. आपल्या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यापूर्वी हे पत्र मिळाल्याचे त्यांनी सांगितले होते. या पत्रात सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचाही उल्लेख आहे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Imran khan, Pakistan

    पुढील बातम्या