'X Æ A-12' असं नाव कोण ठेवतं? नेटकरी शोधत आहेत एलन मस्कच्या मुलाच्या नावाचा अर्थ

'X Æ A-12' असं नाव कोण ठेवतं? नेटकरी शोधत आहेत एलन मस्कच्या मुलाच्या नावाचा अर्थ

सेलिब्रिटींनी त्यांच्या मुलांची नाव विचित्र ठेवणे काही नवीन नाही. यामध्ये आता एलन मस्क यांच्या मुलाच्या नावाचीही भर पडली आहे. 'X Æ A-12' असं नाव ठेवल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा अक्षरश: पाऊस पडला आहे.

  • Share this:

06  मे : सेलिब्रिटींनी त्यांच्या मुलांची नाव काहीतरी वेगळी किंवा विचित्र ठेवणं काही नवीन नाही आहे. अगदी सैफ अली खान आणि करिना कपूरने त्यांच्या मुलाचं नाव तैमुर ठेवलं होतं त्यावेळी देखील त्यांना ट्रोल करण्यात आले होते. Kim Kardarshian ने सुद्धा तिच्या पहिल्या मुलीचं नाव 'नॉर्थ वेस्ट' ठेवलं आहे. आता या विचित्र नावांमध्ये आणखी एक भर पडली आहे. Tesla Inc चे सीईओ एलन मस्क (Elon Musk) यांनी त्यांच्या मुलाचं नाव 'X Æ A-12' ठेवलं आहे. हो तुम्ही वाचलं ते बरोबर आहे. X Æ A-12 असं एलन मस्कच्या बाळाचं नाव असणार आहे. या नावामुळे सध्या सोशल मीडियावर खूप मीम्स व्हायरल होत आहेत. नावाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न सोशल मीडियावर केला जातोय.

एलन यांचा मुलगा मोठा झाल्यावर त्याच्या नावामुळे कोणत्या परिस्थितीला त्याला सामोरे जावे लागेल याबाबतीतही काही मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

संकलन, संपादन- जान्हवी भाटकर

First published: May 6, 2020, 4:19 PM IST
Tags: elon musk

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading