मराठी बातम्या /बातम्या /विदेश /Elon Musk Twitter : एलन मस्क सर्वांना हरवतील पण 'या' महिलेला नाही, अशी वाचवली ट्विटरची नोकरी

Elon Musk Twitter : एलन मस्क सर्वांना हरवतील पण 'या' महिलेला नाही, अशी वाचवली ट्विटरची नोकरी

एका महिलेने एलन मस्कना दिला दणका, कोर्टात धाव घेत वाचवली ट्विटरमधील नोकरी

एका महिलेने एलन मस्कना दिला दणका, कोर्टात धाव घेत वाचवली ट्विटरमधील नोकरी

एलन मस्क यांनी ट्विटर हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकत घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यास सुरुवात केली आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 01 डिसेंबर : उद्योगपती आणि टेस्लाचे सह-संस्थापक एलन मस्क यांनी ट्विटर हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकत घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यास सुरुवात केली. त्यांना ट्विटरमधील कर्मचाऱ्यांची संख्या निम्म्याने कमी करायची आहे. त्याच वेळी, ट्विटरमध्ये एक महिला कर्मचारीदेखील आहे, जिला एलन मस्क कामावरून काढू शकत नाहीयेत. एलन मस्क या महिला कर्मचाऱ्याकडून हरले आहेत, असंही म्हणता येईल, कारण इच्छा असूनही त्यांना तिला ट्विटरमधून कामावरून काढता येत नाहीये.

ट्विटरमधील पब्लिक पॉलिसीच्या ग्लोबल व्हाईस प्रेसिडंट सिनेड मॅकस्विनी (Sinead McSweeney) यांनी आयर्लंडच्या हायकोर्टाकडून ट्विटरमधून त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यापासून रोखणारा आदेश मिळवला आहे. आयरिश टाईम्सच्या वृत्तानुसार, आयर्लंडमधील कंपनीच्या सीनिअर एक्झिक्युटिव्ह मॅकस्विनी यांनी हायकोर्टात सांगितलं की, ‘एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून कंपनीत काम करणं खूप कठीण झालंय. मी आठवड्यातून 75 तासांपेक्षा जास्त काम करत आहे, तर माझ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आठवड्याला फक्त 40 तास काम करण्याची अट होती.’

हे ही वाचा : दोन मोबाईलमध्ये एक WhatsApp नंबर वापरता येणार; इंटरनेटचीही आवश्यकता नाही

मॅकस्विनी यांनी कोर्टात काय सांगितलं.

मॅकस्विनी यांनी कोर्टाला सांगितलं की ‘नोव्हेंबर 2022 च्या सुरुवातीला एलन मस्क यांनी ट्विटरमधील सर्व कर्मचाऱ्यांना एक जेनरिक ई-मेल पाठवला होता. मी या ई-मेलला कोणताही प्रतिसाद दिला नाही आणि माझं काम चालू ठेवलं. इथूनच त्रास सुरू झाला आणि माझ्याकडून जास्त काम करून घेण्यात आलं. मला अशी वागणूक दिली गेली, जसं मी ट्विटरचा भागही नाही.’ यानंतर मॅकस्विनी यांना ट्विटरच्या डब्लिनमधील ऑफिसमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली. यासोबतच त्यांना ऑफिसमधील इंटर्नल आयटी सिस्टिममधूनही वगळण्यात आलं. तसंच त्यांचं कंपनीचं ई-मेल अकाउंटही बंद करण्यात आलं.

हायकोर्टात ट्विटर बॅकफूटवर

कथितरित्या ट्विटरने आयर्लंडमधील कंपनीच्या सीनिअर एक्झिक्युटिव्ह सिनेड मॅकस्विनी यांना सांगितलं की त्यांनी कंपनीने ऑफर केलेलं एक्झिट पॅकेज स्वीकारलं आहे. त्याच वेळी, मॅकस्विनींच्या मते, त्यांनी अद्याप ट्विटरचा राजीनामा दिलेला नाही. मॅकस्विनी यांनी खटला दाखल केल्यानंतर ट्विटरने हायकोर्टात सांगितलं की मॅकस्विनीच्या काम करण्याच्या वचनबद्धतेबद्दल कधीही कोणताच प्रश्न नव्हता.

हे ही वाचा : स्मार्टवॉचनं काढा झक्कास फोटो, असा कंट्रोल करा तुमच्या स्मार्टफोनचा कॅमेरा

तसंच कंपनीच्या आयटी सिस्टममध्ये मॅकस्विनीना पुन्हा अॅक्सेस उपलब्ध करून दिला जाईल, असं आश्वासन ट्विटरने कोर्टात दिले. यानंतर उच्च न्यायालयाने मॅकस्विनी यांना ट्विटरमधून कामावरून काढून टाकण्यासंबंधी अंतरिम संरक्षण दिलं.

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ट्विटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं जात आहे. अशातच सिनेड मॅकस्विनी यांनी कोर्टात धाव घेत त्यांची नोकरी वाचवली आहे.

First published:

Tags: Elon musk, Tweet, Twitter, Twitter War