मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /स्मार्टवॉचनं काढा झक्कास फोटो, असा कंट्रोल करा तुमच्या स्मार्टफोनचा कॅमेरा

स्मार्टवॉचनं काढा झक्कास फोटो, असा कंट्रोल करा तुमच्या स्मार्टफोनचा कॅमेरा

स्मार्टवॉचनं काढा झक्कास फोटो, असा कंट्रोल करा तुमच्या स्मार्टफोनचा कॅमेरा

स्मार्टवॉचनं काढा झक्कास फोटो, असा कंट्रोल करा तुमच्या स्मार्टफोनचा कॅमेरा

आता स्मार्टवॉचच्या मदतीने स्मार्टफोनमधला कॅमेरा कंट्रोल करता येतो. काही मॉडेल्समध्ये हे फीचर देण्यात आलं आहे. अ‍ॅपलसह काही कंपन्यांच्या स्मार्टवॉचेसमध्ये म्युझिक आणि कॅमेरा कंट्रोल फीचर इनबिल्ट देण्यात आली आहेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 24 नोव्हेंबर: काही वर्षांपूर्वी म्हणजेच स्मार्टफोन येण्यापूर्वी फोटोग्राफीसाठी केवळ कॅमेराचा वापर केला जात होता. स्मार्टफोन आल्यानंतर फोटोग्राफीत आमूलाग्र बदल झाला. फोटोग्राफीसाठी कॅमेराऐवजी स्मार्टफोनचा वापर सुरू झाला. युझर्सची गरज आणि मागणी ओळखून बहुतांश कंपन्यांनी स्मार्टफोनमधला कॅमेरा आणि फोटोग्राफी फीचर्समध्ये बदल केले. आता एक नवं गॅजेट फोटोग्राफीसाठी वापरण्याकडे कल वाढताना दिसत आहे. आता स्मार्टवॉचच्या साह्यानेही फोटोग्राफी करता येते. स्मार्टवॉचच्या मदतीने स्मार्टफोनमधला कॅमेरा कंट्रोल करता येतो. काही स्मार्टवॉचेसमध्ये ही सुविधा दिली जाते. ही स्मार्टवॉचेस नेमकी कोणती आहेत आणि त्यातलं कॅमेरा कंट्रोल फीचर कसं वापरायचं हे जाणून घेऊ या.

    स्मार्टवॉचमध्ये वेगवेगळ्या सुविधा मिळतात. स्मार्टवॉचच्या मदतीने आरोग्यविषयक बाबी ट्रॅक आणि मॉनिटर करता येतात. वेगवेगळ्या कंपन्या काळानुरूप स्मार्टवॉच फीचर्समध्ये बदल करत असतात. त्यानुसार आता स्मार्टवॉचच्या मदतीने स्मार्टफोनमधला कॅमेरा कंट्रोल करता येतो. काही मॉडेल्समध्ये हे फीचर देण्यात आलं आहे. अ‍ॅपलसह काही कंपन्यांच्या स्मार्टवॉचेसमध्ये म्युझिक आणि कॅमेरा कंट्रोल फीचर इनबिल्ट देण्यात आली आहेत. याशिवाय थर्डपार्टी अ‍ॅप्सच्या मदतीने स्मार्टवॉचवरच्या या फीचरचा वापर करता येतो.

    हेही वाचा: तुमचं व्हॉट्सअ‍ॅप चॅट दुसरं कुणीतरी वाचतंय कां? फक्त 3 क्लिकमध्ये मिळणार माहिती

    स्मार्टवॉचमध्ये कॅमेरा कंट्रोल फीचर इनबिल्ट असेल, तर आधी स्मार्टवॉच स्मार्टफोनला कनेक्ट करावं लागेल. त्यानंतर सहजपणे फोटो क्लिक करता येतील. सॅमसंग आणि गुगल स्मार्टवॉचमध्ये कॅमेरा कंट्रोलसाठी या कंपन्यांनी स्वतःचं अ‍ॅप दिलं आहे.

    पिक्सेल वॉचवर फोटो काढण्यासाठी एक खास प्रोसेस आहे. तुम्ही प्ले स्टोअरच्या स्मार्टवॉच व्हर्जनवरून तुमच्या वॉचमध्ये गुगल कॅमेरा अ‍ॅप डाउनलोड करून तुमच्या फोनमधला कॅमेरा रिमोट कंट्रोलच्या साह्याने नियंत्रित करू शकता. ही सुविधा केवळ वेअर ओएस 2 आणि वेअर ओएस 3 असलेल्या डिव्हाइसवर मिळते. हे फीचर वापरण्यासाठी सर्वप्रथम कॅमेरा स्क्रीनचा शोध घेण्यासाठी स्मार्टवॉच सेट करा. अ‍ॅप्सचा शोध घेण्यासाठी वरच्या दिशेनं स्वाइप करा. त्यानंतर कॅमेरा या ऑप्शनवर क्लिक करा. तीन सेकंदांचा सेल्फ टायमर सुरू करा आणि शटर बटण दाबण्यासाठी स्मार्टवॉचच्या स्क्रीनच्या मध्यभागी टॅप करा.

    सॅमसंग गॅलॅक्सी वॉच 4 किंवा वॉच 4 क्लासिक असेल, तर त्यात कॅमेरा कंट्रोलर अ‍ॅप इनबिल्ट असतं. तुमच्याकडे Tizen OS वर चालणारं सॅमसंगचं जुनं स्मार्टवॉच असेल तर तुम्हाला कॅमेरा कंट्रोलर अ‍ॅप डाउनलोड करावं लागेल. या स्मार्टवॉचच्या मदतीने फोटो क्लिक करण्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतात. या स्टेपनुसार, सर्वप्रथम गॅलक्सी वॉचमधलं कॅमेरा कंट्रोलर अ‍ॅप सुरू करा. त्यानंतर शॉट सेट करा. व्हिडिओसाठी फोनवरचा व्हिडिओ मोड सुरू करा. त्यानंतर फोटो किंवा व्हिडिओ कॅप्चर करण्यासाठी रेकॉर्ड बटणावर टॅप करावं. या खास टिप्सचा वापर करून तुम्ही स्मार्टवॉचच्या माध्यमातून फोटो क्लिक करू शकता.

    First published:
    top videos

      Tags: Smart phone, Smartwatch, Smartwatch features