मराठी बातम्या /बातम्या /विदेश /अमेरिकेत 8.2 तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीच्या इशाऱ्याने नागरिकांमध्ये घबराट

अमेरिकेत 8.2 तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीच्या इशाऱ्याने नागरिकांमध्ये घबराट

 अमेरिकेतील (US) अलास्का (Alaska) परिसर बुधवारी जोरदार भूकंपाने (Earthquake) हादरला. स्थानिक वेळेनुसार बुधवारी रात्री अलास्का परिसरात 8.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला.

अमेरिकेतील (US) अलास्का (Alaska) परिसर बुधवारी जोरदार भूकंपाने (Earthquake) हादरला. स्थानिक वेळेनुसार बुधवारी रात्री अलास्का परिसरात 8.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला.

अमेरिकेतील (US) अलास्का (Alaska) परिसर बुधवारी जोरदार भूकंपाने (Earthquake) हादरला. स्थानिक वेळेनुसार बुधवारी रात्री अलास्का परिसरात 8.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला.

न्यूयॉर्क, 29 जुलै : अमेरिकेतील (US) अलास्का (Alaska) परिसर बुधवारी जोरदार भूकंपाने (Earthquake) हादरला. स्थानिक वेळेनुसार बुधवारी रात्री अलास्का परिसरात 8.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला. युएस जिओलॉलिजकल सर्व्हे (USGS) यांनी ही माहिती दिली आहे. या भूकंपामुळे भविष्यात त्सुनामी (Tsunami) येण्याचा इशारा देण्यात आला असून अमेरिकेतील सर्व समुद्रकिनाऱ्यांना सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे.

अमेरिकेच्या जिऑलॉजी विभागानं दिलेल्या माहितीनुसार रात्री 11.15 वाजण्याच्या सुमाराला जमिनीखाली 29 मैलांवर या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचं सांगण्यात आलं आहे. सुदैवानं भूकंपाच्या केंद्रापासून दूरपर्यंत या भूकंपाचा प्रभाव जाणवला नाही. या भूकंपात कुठलीही जिवित किंवा वित्त हानी झाल्याचेही वृत्त नाही. मात्र यामुळे अमेरिकेच्या किनारपट्टीजवळ राहणाऱ्या नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे.

त्सुनामीचा इशारा

अशा प्रकारे जमिनीखाली होणारे भूकंप हा त्सुनामीचा इशारा असतो, हे यापूर्वीही अऩेकदा सिद्ध झालं आहे. अमेरिकेत यापूर्वी आलेल्या त्सुनामीपूर्वी भूकंपाचं सत्र अनुभवायला मिळालं होतं. भूगर्भातील हालचालींवर त्सुनामीचा अंदाज काढता येत असल्यामुळे जर भूकंपाच्या धक्क्यांचं हे सत्र सुरुच राहिलं, तर त्सुनामी येण्याची शक्यता अधिक गडद होत जाईल, असं भूगर्भ शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे.

हे वाचा -हा एलियन तर नव्हे? जर्मन प्रवाशाला विमानातून दिसला UFO, पाहा Photos

मुख्य भूकंपानंतर त्यापेक्षा कमी तीव्रतेचा दोन धक्केदेखील काही तासांच्या अंतरानं जाणवल्यामुळे अलास्का, अलास्कातील पेनिनसुला आणि एलेयुटियन बेटांना विशेष सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. समुद्रकिनाऱ्यापासून जवळ राहणाऱ्या लोकांना तातडीनं सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू करण्यात आलं असून अधिकाधिक नागरिकानी स्वतःहून किनारी भागातून काही महिन्यांसाठी इतरत्र स्थलांतरीत होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

First published:
top videos

    Tags: Earthquake, Tsunami, United States of America