आतापर्यंत अनेकांनी एलियन्स असल्याचे आणि पाहिल्याचे दावे केले आहेत. मात्र प्रत्यक्षात ही गोष्ट अजून सिद्ध झालेली नाही. जर्मनीच्या एका प्रवाशाने एका विमान प्रवासादरम्यान एक UFO पाहिला आणि कॅमेऱ्यात कैद केला.
'द सन'नं छापलेल्या बातमीनुसार या युएफओनं विमानाचा 7 मिनिटं पाठलाग केल्याचं म्हटलं आहे. या प्रवाशानं ही घटना कॅमेऱ्यात चित्रित केल्यामुळं त्याचा दावा अऩेकजण गांभिर्यानं घेत आहेत.
ही काहीतरी कॉन्स्पिरसी थिअरी असावी, असा संशय या प्रवाशानं व्यक्त केला आहे. जमिनीपासून हजारो फूटांवर हा घटक विमानाचा पाठलाग करत होता.
याचा पुरावा म्हणून या जर्मन पर्यटकाने एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. त्यामुळे पांढऱ्या रंगाची आणि आकार बदलणारी एक आकृती विमानाचा पाठलाग करताना दिसते.
विमानाच्या खिडकीबाहेर पाण्याचा थेंब होता. त्याचा आकार बदलत होता. मात्र पर्यटकाला तो एलियन वाटला असावा, असा दावाही काहींनी केला आहे.