मराठी बातम्या /बातम्या /विदेश /आधीच आर्थिक संकट, आता भूकंपाचे दणके; पाकिस्तानमध्ये 11 जणांचा मृत्यू

आधीच आर्थिक संकट, आता भूकंपाचे दणके; पाकिस्तानमध्ये 11 जणांचा मृत्यू

pakistan earthquake

pakistan earthquake

भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानमध्ये होते. लाहोर, इस्लामाबाद, पेशावर, झेलम, शेखूपुरा, स्वात, नौशेरा, मुल्तान, स्वात, शांगला यासह विविध भागात भूकंपाचे धक्के जाणवले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

कराची, 22 मार्च : भारतासह अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये मंगळवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. पाकिस्तानच्या काही भागात भूकंपाचे तीव्र धक्के बसले. याची तीव्रता ६.८ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. काही नागरीक घरातून बाहेर पळाले.

पाकिस्तानच्या हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानमध्ये होते. लाहोर, इस्लामाबाद, पेशावर, झेलम, शेखूपुरा, स्वात, नौशेरा, मुल्तान, स्वात, शांगला यासह विविध भागात भूकंपाचे धक्के जाणवले. पाकिस्तानमधील भूकंपात आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. भूकंपाचे धक्के इतके मोठे होते की अनेक घरे कोसळली. उंच इमारतींमधील लोक घरातून बाहेर आले आणि बराच वेळ भूकंपानंतर जाणवणाऱ्या धक्क्यांच्या भितीने बाहेरच होते.

Delhi Earthquake : भारतामध्ये भूकंपाचे चार झोन, महाराष्ट्राला किती आहे धोका? 

युनायटेड स्टेट्सच्या जिओलॉजिकल सर्वेच्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानमधील जुर्ममध्ये १८० किमी खोल होते. भूकंपाचे धक्के भारत, अफगाणिस्तान, किर्गीस्तान, उजबेकिस्तान, चीनसह अनेक देशात जाणवले. याची तीव्रता ६.६ रिश्टर स्केल इतकी होती. रात्री सव्वा दहाच्या सुमारास भूकंप झाला. पाकिस्तानमधील आपत्कालीन सेवा विभागातील प्रवक्त्याने सांगितलं की, खैबर पख्तूनख्वा प्रांतात नागरिकांना भीतीने धक्का बसल्यानंतर १०० जणांना रुग्णालयात नेण्यात आलं.

पाकिस्तानचे आरोग्य मंत्री अब्दुल कादिर पटेल यांनी पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेससह फेडरल गव्हर्नमेंट पॉलिक्लिनिकमध्ये एका आपत्कालीन अलर्ट जारी केला आहे. जखमींना सरकारी मदत पोहोचवण्यासाठी राज्य सरकारच्या अनेक टीमना तैनात केलं आहे. रात्रीच्या वेळी दुर्गम भागात पथके पोहोचू शकली नव्हती. सर्वाधिक नुकसान पर्वतांमध्ये असलेल्या गावांमध्ये झालं आहे. पाकिस्तान आधीच आर्थिक संकटात असून त्यात नैसर्गिक संकटाने देश आणखी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

First published:
top videos

    Tags: Pakistan