मराठी बातम्या /बातम्या /देश /Delhi Earthquake : भारतामध्ये भूकंपाचे चार झोन, महाराष्ट्राला किती आहे धोका?

Delhi Earthquake : भारतामध्ये भूकंपाचे चार झोन, महाराष्ट्राला किती आहे धोका?

भारतामध्ये भूकंपाचे चार झोन

भारतामध्ये भूकंपाचे चार झोन

दिल्लीसह उत्तर भारत पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरला आहे. भूकंप क्षेत्राच्या आधारावर भारताची विभागणी झोन-2, झोन-3, झोन-4 आणि झोन-5 मध्ये करण्यात आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

नवी दिल्ली, 21 मार्च : दिल्लीसह उत्तर भारत पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरला आहे. दिल्ली-एनसीआरशिवाय हिमाचल, राजस्थानच्या अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भारताशिवाय पाकिस्तान आणि अफगाणिस्तान, ताजिकिस्तान आणि चीनमध्येही या भूकंपाची दाहकता जाणवली आहे. अफगाणिस्तान हा या भूकंपाचा केंद्रबिंदू असून रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 7.7 इतकी नोंदवण्यात आली आहे.

दिल्ली-एनसीआर आणि उत्तर भारतातला या वर्षातला हा तिसरा भूकंप आहे. पण 21 मार्चच्या या भूकंपाची तीव्रता जास्त होती, कारण हा भूकंप 9 ते 10 सेकंद जाणवला.

हिमालयीन प्रदेशात मोठा भूकंप होण्याचा धोका आहे, ज्यामुळे मोठ्या क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो, असा इशारा आधीच वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिऑलॉजीच्या शास्त्रज्ञांनी इशारा दिला होता. तसंच आयआयटी कानपूरच्या पृथ्वी विज्ञान विभागाच्या प्राध्यापकांनीही भविष्यात मोठा भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली होती. भारतीय प्लेट आणि युरेशियन प्लेट यांच्यातील टक्कर पृथ्वीखाली वाढत आहे, असं या प्राध्यापकांनी सांगितलं होतं.

वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिऑलॉजी, डेहराडूनच्या शास्त्रज्ञांच्या मते, हिंदुकुश पर्वतापासून ईशान्य भारतापर्यंतचा हिमालयाचा प्रदेश भूकंपासाठी अत्यंत संवेदनशील आहे. सध्याच्या भूकंपाचा केंद्रबिंदूही हिंदुकुश प्रदेशात असल्याचे सांगण्यात येत आहे. हिमालयीन प्रदेशात भूगर्भीय ऊर्जा आणि नवीन भूस्खलन क्षेत्रे तयार होत आहेत, ज्यामुळे भूकंप होतात.

भारतात भूकंपाचे चार झोन

भारतीय उपखंडात भूकंपाचा धोका वेगवेगळ्या ठिकाणी बदलतो. भूकंप क्षेत्राच्या आधारावर भारताची विभागणी झोन-2, झोन-3, झोन-4 आणि झोन-5 मध्ये करण्यात आली आहे. झोन 2 हा सर्वात कमी धोकादायक झोन आहे आणि झोन-5 हा सर्वात धोकादायक झोन मानला जातो.

ईशान्येकडील सर्व राज्ये, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील काही भाग फक्त झोन-5 अंतर्गत येतात. उत्तराखंडच्या कमी उंचीच्या भागांपासून ते उत्तर प्रदेश आणि दिल्लीचा बहुतांश भाग झोन-4 अंतर्गत येतो. मध्य भारतासह महाराष्ट्र तुलनेने कमी धोक्याच्या झोन-3 मध्ये येतो, तर दक्षिणेकडील बहुतांश भाग मर्यादित धोक्यासह झोन-2 मध्ये येतात.

First published:
top videos