ट्रम्प समर्थकांच्या हिंसक गोंधळात उंचावला गेला भारताचाही झेंडा, पाहा VIRAL VIDEO

ट्रम्प समर्थकांच्या हिंसक गोंधळात उंचावला गेला भारताचाही झेंडा, पाहा VIRAL VIDEO

अमेरिकन निवडणुकीत झालेला डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा पराभव मान्य नसलेल्या समर्थकांनी तिथल्या संसद भवनात मोठाच धुडघुस घातला. तिथं उंचावलेल्या झेंड्यांपैकी एक झेंडा भारताचा तिरंगाही दिसतो आहे.

  • Share this:

मुंबई, 7 जानेवारी : डोनाल्ड ट्रम्प (Donald trump) यांच्या शेकडो समर्थकांनी कमालीच्या असंसदीय पद्धतीनं माजवलेली हिंसा (violence) आणि गोंधळ वॉशिंग्टन डीसीच्या (Washington DC) कॅपिटॉल (Capitol) या संसद भवनाच्या इमारतीत गुरुवारी (Thursday) पाहायला मिळाला. अमेरिकन नागरिकांसह (American citizens) जगही या धक्क्यातून अजून सावरतेच आहे. या गोंधळातल्याच एका व्हिडीओची भारतात विशेष चर्चा होत आहे.

ट्रम्प यांचे समर्थक कॅपिटॉल बिल्डिंगसमोर जमलेले असताना त्यात एक समर्थक भारताचा तिरंगा झेंडा (Indian flag) उंचावत फडकवताना दिसतो आहे. हा व्यक्ती नक्की कोण आहे हे अद्याप झालेले नाही. शिवाय त्या व्यक्तीच्या राजकीय विचारधारेबाबतही काही माहिती समोर आलेली नाही. मात्र तिथं अमेरिकन निवडणुकांबाबत चाललेल्या विरोधप्रदर्शनात भारताचा झेंडा उंचावला गेल्याने अनेकांना आश्चर्य वाटते आहे.

(हे वाचा- अमेरिकेच्या Capitol वर ट्रम्प समर्थकांची गर्दी; हिंसाचारात 4 जणांचा मृत्यू)

भाजपचे खासदार वरुण गांधी (Varun Gandhi) यांनीही याबाबत ट्विट करत लोकांचं लक्ष वेधलं आहे. हा व्हिडीओ ट्वीट करत वरुण गांधी यांनी म्हटलं आहे की, 'या आंदोलनात भारतीय झेंडा कुठून आलाय? आपण सहभागी व्हावं असा हा लढा नक्कीच नाही...'

या हिंसेत एकूण चार व्यक्तींचा मृत्यू झाल्याचं समोर येतं आहे. 'अमेरिकन लोकशाहीचं प्रतीक असलेल्या संसदेवरचा गेल्या 200 वर्षात झालेला अत्यंत निषेधार्ह आणि विकृत हल्ला' असं 'रॉयटर्स'नं याचं वर्णन केलं आहे. 'रॉयटर्स'च्या वृत्तानुसार, दंगेखोर लोकांनी धातूचे मजबूत सुरक्षा बॅरिकेड्स तोडून आत प्रवेश केला. भिंतींची तोडफोड करत खिडक्याही फोडल्या. स्थानाईक पोलिसांननी दिलेल्या माहितीनुसार, 'रॉयटर्स'नं म्हटलं आहे, चार लोकांचा यात मृत्यू झाला आहे. आणि 52 लोकांना अटक झाली आहे.

(हे वाचा-चीनमधील उद्योगपती Jack Ma गेल्या 2 महिन्यांपासून बेपत्ता, हे होते शेवटचे शब्द...)

अमेरिकन काँगेसचं सत्र चालू असतानाच हत्यारबंद ट्रम्प समर्थक संसदेत घुसले. सत्र मध्येच थांबवत संसद प्रतिनिधींना सुरक्षित स्थळी लपत स्वतःचा बचाव करावा लागला. या घटनेनंतर ट्रम्प यांनी ट्विटरवर एक व्हीडिओ प्रसारित करत आपल्या समर्थकांना घरी परतण्याचं आवाहन केलं. मात्र अमेरिकेच्या निवडणुकीत विजय जो बायडन यांचा नाही तर आपलाच झाला आहे असा दावाही त्यांनी पुन्हा एकदा केला.

Published by: News18 Desk
First published: January 7, 2021, 3:35 PM IST

ताज्या बातम्या