वॉशिंग्टन, 7 जानेवारी : अमेरिकेतील व्हाइट हाऊस आणि संसद भवनात झालेल्या हिंसाचारातील मृतांचा आकडा 4वर पोहोचला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी हा हिंसाचार घडवून आणला होता. पोलिसांनी आतापर्यंत 52 जणांना ताब्यात घेतला आहे. जो बायडन यांच्या विजयाच्या शिक्कामोर्तब करण्यासाठी सुरू असलेल्या बैठकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी अक्षरश: हैदोस घातला. मोठ्या प्रमाणात इमारतीचं नुकसान केलं. त्या दरम्यान पोलीस आणि समर्थक यांच्यात झालेल्या चकमकीदरम्यान आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी स्फोटकं देखील जप्त केली आहे. अमेरिकेतील घडलेल्या या हिंसाचारामुळे प्रचंड तणावाचं वातावरण आहे. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फेसबुक, ट्वीटर, इन्टाग्रामने नियम आणि धोरणांचं उल्लंघन केल्याचा आरोप करत कारवाई केली आहे. ट्विटरने 12 तर फेसबुक, इन्स्टाग्रामनं 24 तासांसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचं सोशल मीडिया अकाऊंट ब्लॉक केलं आहे. कर्फ्यू असतानाही नियमांचं उल्लंघन करणं आणि कॅपिटलमधील हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी 52 जणांना ताब्यात घेतलं आहे.
#WashingtonDC Police say 52 have been arrested, following the violence at the US Capitol, reports Reuters https://t.co/SEc7C3DZnZ
— ANI (@ANI) January 7, 2021
Police say four people died as Trump supporters occupied the US Capitol in Washington DC. One woman was shot by the U.S. Capitol police as a mob tried to break through a barricaded door, and three died in medical emergencies, reports The Associated Press https://t.co/W1e3J1JkJf
— ANI (@ANI) January 7, 2021
हे वाचा-डोनाल्ड ट्रम्प यांचं FB-Instagram 24 तर ट्विटर अकाऊंट 12 तासांसाठी ब्लॉक
अमेरिकेच्या कॅपिटल बिल्डिंगमध्ये अनेक विधिमंडळ आणि संस्था ट्रम्प यांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी घडवून आणलेल्या हिंसाचारानंतर ट्रम्प यांना पदावरून हटवण्याची मागणी करत आहेत. ट्रम्प समर्थकांनी ज्या इमारतीत हल्ला केला त्या इमारतीत अमेरिकन काँग्रेसचे सदस्य बसले होते. या घटनेनंतर बरेच खासदार आणि राज्यपाल ट्रम्प यांच्यावर महाभियोग दाखल केला आहे. राज्यघनेतील 25 व्या दुरुस्त केलेल्या कलमाचा वापर करून ट्रम्प यांना पदावरून काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. रिपब्लिकन पक्षाचे गव्हर्नर फिल स्कॉट यांनी देखील ट्वीट केलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचे राष्ट्राध्यक्षपदाचे 14 दिवस अद्यापही बाकी असताना आता त्यांना त्या पदावरून काढून टाकावं अशी मागणी जोर लावून धरली जात आहे. या हिंसाचारानंतर आता वॉशिंग्टनमध्ये 15 दिवस आणीबाणी लागू करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Donald Trump, President of america, United States of America