मराठी बातम्या /बातम्या /विदेश /खिडकीवर कपडे वाळत घातले तर 30 हजारांचा दंड, बाल्कनीत सिगरेट ओढल्यास कारवाई; ‘या’ नगरपालिेकेचे नियम

खिडकीवर कपडे वाळत घातले तर 30 हजारांचा दंड, बाल्कनीत सिगरेट ओढल्यास कारवाई; ‘या’ नगरपालिेकेचे नियम

बाल्कनीत कपडे वाळत घालणं, सिगरेट ओढणं, पाणी ओतणं यासाठी आता कडक दंडाची तरतूद एका मोठ्या शहरातील नगरपालिकेनं केली आहे.

बाल्कनीत कपडे वाळत घालणं, सिगरेट ओढणं, पाणी ओतणं यासाठी आता कडक दंडाची तरतूद एका मोठ्या शहरातील नगरपालिकेनं केली आहे.

बाल्कनीत कपडे वाळत घालणं, सिगरेट ओढणं, पाणी ओतणं यासाठी आता कडक दंडाची तरतूद एका मोठ्या शहरातील नगरपालिकेनं केली आहे.

दुबई, 28 डिसेंबर: खिडकीत (Window) कपडे (Clothes drying) वाळत घालणं, बाल्कनीत (Balcony) उभं राहून सिगरेटची राख (Ash of Cigarette) खाली टाकणं यासारख्या नियमांसाठी दुबई नगरपालिकेनं (Dubai administration) कडक नियम (Strict rules) तयार केले आहेत. शहर स्वच्छ आणि सुशोभित राहण्यासाठी हे नवे नियम तयार करण्यात आले असून त्यांचं उल्लंघन केलं, तर भलामोठा दंड भरावा लागणार आहे. शहरातील नागरिकांना शिस्त लागावी आणि शहराचा जागतिक दर्जा अबाधित राहावा, यासाठी या नव्या नियमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. 

पालिकेची भूमिका

नागरिकांच्या ज्या ज्या कृत्यांमुळे शहर विद्रुप होऊ शकतं किंवा घाण होऊ शकतं, अशा प्रत्येक गोष्टीसाठी दंडाची तरतूद करण्यात आली आहे. नागरिकांनी आपलं अपार्टमेंट किंवा बाल्कनी यांचा ‘दुरुपयोग’ करू नये, अशा सूचना नगरपालिकेनं नागरिकांना केल्या आहेत. आपली बाल्कनी विद्रुप दिसेल, अशी कुठलीही कृती नागरिकांना यापुढे करण्यास मनाई असेल, अशी सूचना दुबई नगरपालिकेच्या सोशल मीडिया हँडलवरून प्रसारित करण्यात आली आहे. पर्यावऱणाची गरज आणि जागतिक मानांकनं यांचा विचार करता शहराचं सौंदर्य आणि स्वच्छता बिघडणार नाही, याची खबरदारी नागरिकांनी घेण्याची गरज आहे, असा संदेश पालिकेनं दिला आहे. 

काय आहेत नियम?

पालिकेने केलेले प्रमुख नियम असे आहेत. 

  • बाल्कनी किंवा खिडकीत कपडे वाळवू नयेत
  • सिगरेटची राख किंवा थोटूक बाल्कनीतून खाली फेकू नये
  • बाल्कनीतून कचरा खाली फेकू नये
  • बाल्कनी धुताना पाणी खाली पडणार नाही, याची खबरदारी घ्यावी
  • एसीचं पाणी गळणार नाही, याची खबरदारी घ्यावी
  • पक्ष्यांना धान्य देण्यास मनाई. त्यामुळे पक्षी घाण करत असल्याचा दावा
  • बाल्कनीत कुठलीही सॅटेलाईट डिश किंवा अँटिना उभा करण्यास मनाई

हे वाचा -

होणार भरभक्कम दंड

या नियमांचं उल्लंघन झालं तर नागरिकांना 500 ते 1500 डिरॅमपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो. भारतीय चलनात ही रक्कम होते 10 हजार ते 30 हजार रुपये. या नियमांचं आता दुबईकर कसं पालन करतात, ते पाहणं महत्त्वाचं आहे. 

First published:
top videos

    Tags: Dubai, Rules