जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / दुबईच्या 'बुर्ज खलिफा'वर झळकली महात्मा गांधींची प्रतिमा, VIDEO होतोय VIRAL

दुबईच्या 'बुर्ज खलिफा'वर झळकली महात्मा गांधींची प्रतिमा, VIDEO होतोय VIRAL

दुबईच्या 'बुर्ज खलिफा'वर झळकली महात्मा गांधींची प्रतिमा, VIDEO होतोय VIRAL

जगाला शांततेचा संदेश देणारे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती (Dubai Burj Khalifa celebrates Mahatma Gandhi birth anniversary) जगभरात साजरी करण्यात आली.

  • -MIN READ
  • Last Updated :

दुबई, 3 ऑक्टोबर : जगाला शांततेचा संदेश देणारे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती (Dubai Burj Khalifa celebrates Mahatma Gandhi birth anniversary) जगभरात साजरी करण्यात आली. दुबईतील प्रसिद्ध बुर्ज खलिफामध्ये महात्मा गांधींना अनोख्या (Burj Khalifa salutes Mahatra Gandhi) पद्धतीनं अभिवादन कऱण्यात आलं. बुर्ज खलिफावर महात्मा गांधींचे फोटो उमटले आणि ते पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली.

जाहिरात

बुर्ज खलिफावर महात्मा गांधींचे फोटो शनिवारी साधारण 11 वाजता महात्मा गांधींचे फोटो बुर्ज खलिफावर झळकले. महात्मा गांधींची शिकवण आणि त्यांचे महत्त्वाचे विचार बुर्ज खलिफावर झळकवण्यात आले. ते पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. काही लोकांनी याचा व्हिडिओदेखील शूट केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. जगाला दिला संदेश जगाला अहिंसा आणि शांततेचा संदेश देणारे नेते म्हणून महात्मा गांधींची ओळख आहे. भारताची आंतरराष्ट्रीय पटलावर असणारी ओळख ही महात्मा गांधींचा देश अशीच आहे. जगभरातील नेते जेव्हा जेव्हा भारतीय नेत्यांना भेटतात आणि भारताबाबत बोलतात, तेव्हा तेव्हा महात्मा गांधींनी वंदन करूनच संवादाची सुरुवात केली आहे. महात्मा गांधींच्या 152 व्या जयंतीचं औचित्य साधत दुबईतील बुर्ज खलिफा या विश्वविक्रमी इमारतीवर महात्मा गांधींच्या विचारांना स्थान देत त्यांना अभिवादन करण्यात आलं. हे वाचा - नागपुरात MBA च्या विद्यार्थिनीवर बलात्कार; वाढदिवशी फिरायला नेत केली भलतीच मागणी गांधींचे विचार प्रेरणादायी जगभरात हिंसा आणि आक्रमकता वाढत असताना महात्मा गांधींचे विचारच जगाला तारू शकतात, असं मत बुर्ज खलिफाच्या प्रशासनानं व्यक्त केलं. महात्मा गांधी हे केवळ भारताला नव्हे, तर जगाला प्रेरणा देणारे नेते होते. जगातील अनेक प्रगत देशांचे नेते हे महात्मा गांधींच्या विचारांनाच आदर्श मानून आपली राजकीय वाटचाल करत आहेत. दुबईत झालेला महात्मा गांधींच्या विचारांचा गौरव हा भारतासाठी निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात